सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री शोभना आगाशे
सुश्री मंजिरी येडूरकर
💐अ भि नं द न 💐
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री शोभना आगाशे आणि सुश्री मंजिरी येडूरकर यांनी एकत्रितपणे लिहिलेल्या “ गीतांजली – जशी भावली तशी “ या उत्कृष्ट काव्य संग्रहाला पुढील दोन पुरस्कार एकाच वेळी घोषित करण्यात आले आहेत हे सांगतांना विशेष आनंद होतो आहे. —–
१ ) नरेंद्र विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यातर्फे उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार.
२ ) मासिक सारांश (मिरज) साहित्य पुरस्कार – २०२३ — विशेष साहित्यकृती पुरस्कार.
💐 या दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी सुश्री शोभना आगाशे, आणि सुश्री मंजिरी येडूरकर या दोघींचेही आपल्या समूहातर्फे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
या दोघींच्या एका कवितेचा आस्वाद आज यानिमित्ताने घेऊ या…
☆
मुरली घेऊन दर्याडोंगरी
सूर चिरंतन निर्मित जाशी
त्या रुपाचे चिंतन करता
माझे अंतर स्पर्शून जाशी ….
☆
स्पर्शाने त्या पुलकित होते
शब्दातीत तुजसवे बोलते
तूच भारिसी चैतन्याने
तूच रिकामा आणि करिशी ….
☆
कलश मम हा देहस्वरूपी
पुनःपुन्हा या धरणीपाशी
अमर्त्य आत्मा वेष बदलुनी
काळोखातून येत प्रकाशी ….
☆
माझी झोळी जरी तोकडी
दाता तू तर असीम असशी
युगे युगे तू देतचि जाशी
तरीही झोळीत जागा राही ….
☆
अनंत मी याचक युगांचा
असशी तू दाता कल्पांचा…
☆
– शोभना आगाशे 9850228658
– मंजिरी येडूरकर 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈