सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री सचिन पाटील
💐 अ भि नं द न 💐
आपल्या समूहातील सिद्धहस्त लेखक श्री सचिन पाटील यांना, त्यांच्या ‘पाय आणि वाटा’ या ललितसंग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा अॅड. त्रिंबकराव शिरोळे स्मृती पुरस्कार घोषित केला गेला आहे.
श्री. सचिन पाटील यांच्या नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या या ‘पाय आणि वाटा’ ललितसंग्रहास रसिक वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी त्यांच्या या संग्रहास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार पुणे, माणगंगा साहित्य परिषद, फलटण, मातृस्मृती साहित्य सन्मान पुरस्कार कामेरी, साहित्य प्रज्ञा मंच पुणे, कृतिशील शिक्षक महाराष्ट्र राज्य, इत्यादी मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कारही लाभले आहेत.
लेखक श्री. सचिन पाटील यांचे आपल्या समूहातर्फे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन, आणि यापुढेही त्यांच्याकडून अशीच दर्जेदार आणि समृद्ध साहित्य-निर्मिती सातत्याने होत राहो यासाठी त्यांना असंख्य हार्दिक शुभेच्छा.
अनेक पुरस्कार प्राप्त झालेला त्यांचा ललित संग्रह ——
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈