सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री शुभदा (विभावरी) कुलकर्णी
🌺 अ भि नं द न 🌺
आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री शुभदा (विभावरी) कुलकर्णी यांचा ‘सोनेरी स्पर्श’ हा दुसरा कथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
अल्प परिचय
मी शुभदा भास्कर कुलकर्णी, पूर्वाश्रमीची विभावरी गजानन जिराईतखाने.
- स्वप्नांचे पंख हा कथासंग्रह व भावफुलें हा काव्यसंग्रह प्रसिद्ध.
- दर्जेदार दिवाळीअंक, मासिके,यातून कथा,ललितलेख, कविता प्रवासवर्णन प्रसिद्ध.
- सकाळ वृत्तपत्रातून सातत्याने ललितलेख प्रसिद्ध झाले होते.
- कांही कथा, कविता, ललितलेखांना पारितोषिक प्राप्त. काही सन्मानपत्र, प्रशस्तीपत्र प्राप्त. निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिके. कथाकथन, काव्यवाचन केले आहे.
- मी एक गृहिणी.पण मला माझ्या साहित्याने स्वतःची ओळख दिली. याचा आनंद व समाधान आहे.
शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
मोबा.९५९५५५७९०८/
💐 सुश्री शुभदा (विभावरी) कुलकर्णी यांचे ई अभिव्यक्ती मराठी समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈