सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री. राजीव गजानन पुजारी
💐अ भि नं द न 💐
विशेषतः वैज्ञानिक विषयांवर अतिशय माहितीपूर्ण आणि उत्तम लेख लिहिणारे आपल्या समूहातील लेखक श्री. राजीव पुजारी यांना “मराठी विज्ञान परिषद“ या मान्यवर संस्थेने आयोजित केलेल्या विज्ञान निबंध स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या स्पर्धेसाठी “पंचाहत्तर वर्षातील भारताची वैज्ञानिक प्रगती“ हा मोठा आवाका असणारा विषय देण्यात आला होता. श्री. पुजारी यांना मिळालेल्या या यशाबद्दल ई-अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना उत्तरोत्तर असेच यश मिळत रहावे यासाठी हार्दिक शुभेच्छा.
यावर्षीच्या ई-अभिव्यक्ती दिवाळी विशेषांकात त्यांचा हा निबंध लेखस्वरूपात प्रकाशित करण्यात आलेला आहे.
कृपया क्लिक करा 👉 ई-अभिव्यक्ती दिवाळी विशेषांक – २०२३
💐 श्री राजीव गजानन पुजारी यांचे ई अभिव्यक्ती मराठी समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈