हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 4 ☆ अंगाराची साथ तुला… ☆ – सौ. सुजाता काळे
सौ. सुजाता काळे
(सौ. सुजाता काळे जी मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं । वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं। उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है सौ. सुजाता काळे जी की ऐसी ही एक संवेदनात्मक भावप्रवण मराठी कविता ‘अंगाराची साथ तुला…’।)
☆ अंगाराची साथ तुला…☆
कोण हरतो ! कोण जिंकतो!
इथे कुणाची खंत कुणा,
जो धडपडतो, जो कळवळतो,
रोजच पडतो ही खंत मना..
अंगाराची साथ तुला…
अंधारातुन दिशा काढ तू,
हाच मानवा संदेश तुला,
हृदयातून पेटव मशाल तू,
मार्ग दाखवी रोज तुला..
अंगाराची साथ तुला…
वादळात जरी पडले घरटे,
जोमाने तू बांध पुन्हा,
थरथरणारे हात ही दबतील,
दगडाखालून काढ जरा..
अंगाराची साथ तुला…
सूर्य सोबती नसो तुझ्या,
ना चंद्र सोबती दिमतीला,
काजव्याची माळ ओवून,
बांध तुझ्या तू भाळाला…
अंगाराची साथ तुला…
लखलखणारा तारा नसू दे,
नशीब तारा चमकव ना,
वसंतातल्या रंग छटा या,
पानगळीत ही पसरव ना…
अंगाराची साथ तुला…
वितळूनी पोलाद स्वतःस बनव तू,
अंगाराची साथ तुला,
ढाल नसु दे चिलखताची,
छाती मधूनी श्वास हवा..
अंगाराची साथ तुला…
© सुजाता काळे …
पंचगनी, महाराष्ट्र।
9975577684