हिन्दी साहित्य – कविता ☆ आयुर्वेद दोहे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे, संपादिका ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ कविता ☆ आयुर्वेद दोहे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे, संपादिका ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

पानी में गुड डालिए, बीत जाए जब रात!

सुबह छानकर पीजिए, अच्छे हों हालात!!

 

ऊर्जा मिलती है बहुत, पिएं गुनगुना नीर!

कब्ज खतम हो पेट की, मिट जाए हर पीर!!

 

प्रातः काल पानी पिएं, घूंट-घूंट कर आप!

बस दो-तीन गिलास है, हर औषधि का बाप!!

 

ठंडा पानी पियो मत, करता क्रूर प्रहार!

करे हाजमे का सदा, ये तो बंटाढार!!

 

भोजन करें धरती पर, अल्थी पल्थी मार!

चबा-चबा कर खाइए, वैद्य न झांकें द्वार!!

 

प्रातः काल फल रस लो, दुपहर लस्सी-छांस!

सदा रात में दूध पी, सभी रोग का नाश!!

 

प्रातः- दोपहर लीजिये, जब नियमित आहार!

तीस मिनट की नींद लो, रोग न आवें द्वार!!

 

भोजन करके रात में, घूमें कदम हजार!

डाक्टर, ओझा, वैद्य का , लुट जाए व्यापार !!

 

घूट-घूट पानी पियो, रह तनाव से दूर!

एसिडिटी, या मोटापा, होवें चकनाचूर!!

 

अर्थराइज या हार्निया, अपेंडिक्स का त्रास!

पानी पीजै बैठकर, कभी न आवें पास!!

 

रक्तचाप बढने लगे, तब मत सोचो भाय!

सौगंध राम की खाइ के, तुरत छोड दो चाय!!

 

सुबह खाइये कुवंर-सा, दुपहर यथा नरेश!

भोजन लीजै रात में, जैसे रंक सुजीत!!

 

देर रात तक जागना, रोगों का जंजाल!

अपच,आंख के रोग सँग, तन भी रहे निढाल!!

 

दर्द, घाव, फोडा, चुभन, सूजन, चोट पिराइ!

बीस मिनट चुंबक धरौ, पिरवा जाइ हेराइ!!

 

सत्तर रोगों कोे करे, चूना हमसे दूर!

दूर करे ये बाझपन, सुस्ती अपच हुजूर!!

 

भोजन करके जोहिए, केवल घंटा डेढ!

पानी इसके बाद पी, ये औषधि का पेड!!

 

अलसी, तिल, नारियल, घी सरसों का तेल!

यही खाइए नहीं तो, हार्ट समझिए फेल!

 

पहला स्थान सेंधा नमक, पहाड़ी नमक सु जान!

श्वेत नमक है सागरी, ये है जहर समान!!

 

अल्यूमिन के पात्र का, करता है जो उपयोग!

आमंत्रित करता सदा, वह अडतालीस रोग!!

 

फल या मीठा खाइके, तुरत न पीजै नीर!

ये सब छोटी आंत में, बनते विषधर तीर!!

 

चोकर खाने से सदा, बढती तन की शक्ति!

गेहूँ मोटा पीसिए, दिल में बढे विरक्ति!!

 

रोज मुलहठी चूसिए, कफ बाहर आ जाय!

बने सुरीला कंठ भी, सबको लगत सुहाय!!

 

भोजन करके खाइए, सौंफ, गुड, अजवान!

पत्थर भी पच जायगा, जानै सकल जहान!!

 

लौकी का रस पीजिए, चोकर युक्त पिसान!

तुलसी, गुड, सेंधा नमक, हृदय रोग निदान!

 

चैत्र माह में नीम की, पत्ती हर दिन खावे !

ज्वर, डेंगू या मलेरिया, बारह मील भगावे !!

 

सौ वर्षों तक वह जिए, लेते नाक से सांस!

अल्पकाल जीवें, करें, मुंह से श्वासोच्छ्वास!!

 

सितम, गर्म जल से कभी, करिये मत स्नान!

घट जाता है आत्मबल, नैनन को नुकसान!!

 

हृदय रोग से आपको, बचना है श्रीमान!

सुरा, चाय या कोल्ड्रिंक, का मत करिए पान!!

 

अगर नहावें गरम जल, तन-मन हो कमजोर!

नयन ज्योति कमजोर हो, शक्ति घटे चहुंओर!!

 

तुलसी का पत्ता करें, यदि हरदम उपयोग!

मिट जाते हर उम्र में,तन में सारे रोग।

मूलहठी = ज्येष्ठमध
चोकर युक्त पिसान = चोकर युक्त आटा 

साभार – निरामय जगत गुजरात (चिकित्सकीय  सलाह आवश्यक ) 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ परदेश – भाग -11 – तहज़ीब ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है नवीन आलेख की शृंखला – “ परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख ☆ परदेश – भाग – 11 – तहज़ीब ☆ श्री राकेश कुमार ☆

हमारे लखनऊ की तहज़ीब “पहले आप, पहले आप” का उदाहरण पूरे देश में दिया जाता हैं। विगत दिनों विदेश प्रवास के समय जब पैदल कुछ गलियों के चौराहों को पार कर रहे थे, तो हर बार चमचमाती हुई कारों के चालक ने रुककर हमें पहले जाने का आंख या हथेली से संकेत किया। आरंभ में हमे ऐसा प्रतीत हुआ, किसी परिचित ने गाड़ी रोककर सम्मान दिया हैं। अर्ध ग्रामीण केंद्र पर शाखा प्रबंधक की पद स्थापना के समय अवश्य कुछ ग्राहक अपनी बाइक रोककर गंतव्य स्थान तक छोड़ने का आग्रह अवश्य करते थे। लेकिन परदेश में तो कोई जानकार है ही नहीं! इसको समझने में कुछ समय लग गया, हम ये भूल गए थे कि   हम अब सेवानिवृत हो चुके हैं।

जब भी पदयात्रा पर कहीं जाते हैं, तो निर्धारित स्थान पर वाहन चालक हमसे पहले जाने की उम्मीद करते हैं। शायद इनको भी बचपन से लखनवी तहज़ीब का ज्ञान दिया गया होगा। कट मारकर तेजी से अपना वाहन ओवर टेक करना हमारे देश में गतिशील बने रहने का हुनर माना जाता है।

हमारे देश में तो अभिनेता और नेता आपको सड़क पर ही कुचल कर आगे निकल जाते हैं। कानून भी ऐसे मौकों पर आँखें मूंदे हुए रहता है। ये भी हो सकता है, यहां पर कानून की आँखें हमेशा खुली रहती हों।

जिन भवनों/ प्रतिष्ठानों के स्वचालित दरवाजे में प्रवेश करने के समय आपके आगे चलने वाला व्यक्ति भी सम्मान में दरवाजा पकड़ कर आपको प्रवेश करने में सहजता से अपनी तहज़ीब का परिचय दे देता है।

कुल मिलाकर यहां के निवासी आतुर नहीं हैं, क्योंकि उनको हमारे देश के लोगों के समान व्हाट्सएप जैसे अन्य सामाजिक मीडिया में घुसे रहने की लत जो नहीं है।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान) 

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #165 ☆ जखमांचा वावर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 165 ?

☆ जखमांचा वावर… ☆

खिळा भिंतीला ठोकला,  आत वीट हादरली

हातोड्याने पुन्हा पुन्हा, वीट किती पोखरली

 

भिंत सांभाळे घराला, ऊन्ह-वात करे तोरा

बाहेरून पावसाने, भिंत किती झोडपली

 

आहे जखमांचा वावर, दुःख छळतंय भारी

नव्हे भिंतीला पोपडा, आहे खपली धरली

 

नको विश्वास ठेवाया, रंगावरती वरच्या

आत डोकावून पाहू, भिंत आतून खचली

 

कौल बापाच्या सारखा, असे हात डोईवर

होती सावली आधार, म्हणून ती सावरली

 

वासा छताच्या खालचा, त्यास भय वाळवीचे

विरोधाला जुमानेना, लाकडे हि पोखरली

 

दिसे विटांचा सांगाडा, छत उडून गेलेले

पायाखालच्या मातीत, भिंत आज विसावली

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अवकाळी पाऊस… ☆ मेहबूब जमादार ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ अवकाळी पाऊस… ☆ मेहबूब जमादार ☆

भर सुगीत आली

पावसाची कथा

पिक गेलं वाहून

कुणा सांगू ही व्यथा

 

पिक फुलता रानी

थके त्याला स्मरून

हाती येता पिक

येतं आभाळ भरून

 

गेलं अंधारून सारं

चित्त विरलं धुक्यात

पाणी भरल्या रानांत

गेली  वाट हरवत

 

कसं पडतं सपान

तुला आलेल्या सुगीचं

का रे तुला समजेनां

गुज दडल्या मनींच

 

हरसाली हिच त-हा

तरी असतं तूझं येणं

किती विणवलं तरी

वरं तूझं कडाडणं

 

डोळं भरूनिया गेलं

तरी नाही परतावा

सांग? शेतकरी राजानं

हात कुठे पसरावा

– मेहबूब जमादार

मु -कासमवाडी पो .पे ठ  जि .सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…4 – शकुंतला ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…4 – शकुंतला  ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

शकुंतला

संस्कृत साहित्यातील एक अजरामर प्रेमकथा म्हणजे दुष्यंत- शकुंतला यांची कथा म्हणावी लागेल. महाभारतातील आदीपर्वात ही कथा आली आहे. अप्सरा मेनका व विश्वामित्र यांची कन्या म्हणजे शकुंतला! ती शिशुअवस्थेत असतानाच मेनका तिला जंगलात सोडून जाते. त्यानंतर ती कण्व मुनींनी सापडते आणि ते तिचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करतात. जेव्हा ती यौवनात येते तेव्हा अतिशय सुंदर दिसत असते. अशाच वेळी एकदा राजा दुष्यंत शिकारीसाठी तिथे आला असताना तिला बघतो व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यावेळी कण्व मुनी आश्रमात नसतात. पण दुष्यंत- शकुंतला गांधर्व विवाह करतात. त्यानंतर राजा दुष्यंत आपली अंगठी तिच्याकडे खूण म्हणून ठेवून आपल्या राजधानीत परत जातो. मधल्या काळात दुर्वास मुनी आश्रमात आले असता राजाच्या आठवणीत रमलेली शकुंतला त्यांना योग्य तो सन्मान देत नाही. त्यामुळे रागावलेले दुर्वास मुनी तिला शाप देतात की ज्याच्या चिंतनात ती मग्न होती तो तिला विसरेल.

काही दिवसांनी कण्व मुनी परत येतात व शकुंतलेच्या विवाहाचे समजल्यावर तिच्या पाठवणीची तयारी करतात. ती दुष्यंताकडे जाते. त्याचवेळी ती गर्भवती पण असते. पण दुर्वासमुनींच्या शापामुळे तो तिला ओळखत नाही व तिचा अपमान करून तिला हाकलून देतो. ती पुन्हा कश्यप ऋषींच्या आश्रमात राहू लागते. तिथेच एका पुत्रालाही जन्म देते.

काही दिवसांनी एका कोळ्याला माशाच्या पोटात दुष्यंताचे नाव असलेली ती खुणेची अंगठी मिळते आणि तो ती नेऊन राजाला देतो. तेव्हा राजाला सर्व आठवते व तो शकुंतलेच्या शोधास बाहेर पडतो. असे ढोबळ मानाने  कथानक आहे.

महाभारतात दुर्वास मुनींचा उल्लेख नाही. मात्र कालिदासाने आपल्या अभिज्ञान शाकुंतल नाटकात रंजकता निर्माण करण्यासाठी तो प्रसंग घातला असावा. आपल्या प्रतिभेच्या जोरावर कालिदासाने हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.

मात्र यातील शकुंतला ही एक अतिशय सामर्थ्यवान आणि स्वावलंबी स्त्री होती असे म्हणावे लागेल. ज्यावेळी ती राजा दुष्यंताच्या प्रेमात पडते त्यावेळी सहजपणे त्याच्याशी गांधर्वविवाह करून मोकळी होते. आजच्या काळात  ‛live in relationship’ बद्दल अनेक चर्चा घडत असताना त्या काळात केला गेलेला किंवा त्यावेळी जे सर्रास गांधर्व विवाह होत असत ते त्याचेच प्रतीक होते का ? अशी शंका सहज उत्पन्न होते. आजच्या लेखात ही चर्चा अपेक्षित नाही. पण त्यावरून त्या काळातील स्त्री किती स्वतंत्र विचाराची होती हे लक्षात येते. शकुंतला हे त्याचेच एक प्रतीक आहे असे मला वाटते. शिवाय आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्यही त्या काळात होते असे लक्षात येते.

शकुंतला आणि तिच्या सख्या म्हणजे प्रियंवदा आणि अनुसूया याना कण्व मुनींनी उत्तम शिक्षण दिले होते. केवळ मौखिक शिक्षण नव्हे तर त्या सर्वजणी उत्तम लेखनही करत असत. कारण नाटकामध्ये कमलपत्रावर शकुंतला दुष्यंतासाठी पत्र लिहिते असा प्रसंग आहे व तिच्या सख्या तिला यासाठी मदत करत असतात.

वास्तविक शकुंतलेला लहानपणी आई- वडिलांचे प्रेम मिळाले नाही. जंगलातील पशु- पक्षी- झाडे यांच्या सहवासातच ती अधिक वाढली. त्यामुळेच बहुतेक तिचे तिने लावलेल्या झाडावेलींवरही तितकेच प्रेम होते. त्यामुळे ती जेव्हा दुष्यंताकडे जायला निघते तेव्हा वारंवार डोळे भरून आपण लावलेल्या वेलींकडे बघते आणि मैत्रिणींना त्यांची काळजी घ्यायची पुन्हा पुन्हा सूचना देते. शिवाय तिचा सांभाळ ज्या कण्व मुनींनी केलेला असतो त्यांचीही तिला काळजी वाटत असते आणि त्यांना सोडून जाताना तिला अतिशय दुःख होत असते. त्यातून एक सहृदयी, कोमल मनाची शकुंतला आपल्याला भेटते.

मात्र एवढी हळवी असणारी शकुंतला जेव्हा दुष्यंत राजाकडे जाते आणि तो तिला ओळखत नाही. शिवाय तो तिचा अपमान करताना म्हणतो,“ हे तपस्विनी, तू मला आणि तुझ्या कुळाला अशाप्रकारे कलंकित करत आहेस ज्याप्रमाणे एखादी नदी आपलाच बांध फोडून बांधावरील झाडे मोडून टाकते आणि स्वतःचे पाणी पण मालिन करते.” ते शब्द ऐकून स्वाभिमानी शकुंतला गर्भवती असण्याचा विचारही न करता दरबारातून बाहेर पडते आणि जन्माला येणाऱ्या जीवाला एकट्यानेच सांभाळायचे ठरवते. आणि पुढे कश्यप ऋषींच्या आश्रमात राहून ते सिद्धही करते. ही स्वाभिमानी आणि निश्चयी शकुंतला त्या काळातील सशक्त स्त्रीचे उदाहरण आहे असे मला वाटते.

काही वर्षांनी राजा दुष्यंताला ती खुणेची अंगठी सापडते व तो शकुंतलेचा शोध घेऊ लागतो. ती सापडल्यावर तिला आपल्याबरोबर येण्यासाठी मनवतो. पण अपमानित झालेली मानी शकुंतला बराच काळ ते मान्य करत नाही. पण शेवटी स्त्रीसुलभ कोमलतेने ती त्याचा प्रस्ताव स्वीकारते आणि मुलासहित  त्याच्याकडे निघून जाते आणि अनेक वर्षे ते सुखाने संसार करतात. यातून शकुंतलेमधील ती स्त्री दिसून येते जी कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य देणारी होती. म्हणूनच त्या प्रसंगी आपला अपमान बाजूला ठेवून ती राजाबरोबर जाण्यास तयार होते.

त्यामुळेच कदाचित  काल्पनिक असली तरी त्या काळातील भावनाप्रधान पण निश्चयी, मानी, विद्याविभूषित स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी शकुंतला पण एका स्त्रीशक्तीचे प्रतीक होती असे मला वाटते.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लक्ष्मीपूजन : पैशाचं डाएट… डाॅ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

? जीवनरंग ?

☆  लक्ष्मीपूजन : पैशाचं डाएट… डाॅ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

लक्ष्मीपूजन : पैशाचं डाएट….

” रिया , लक्षात आहे ना ? उद्या लक्ष्मीपूजन आहे तर पैसे खर्च करायचे नाहीत. तुला काही हवं असेल तर आजच आणून ठेव.” आईने दम दिला.

“हो गं बाई, किती वेळा सांगशील ? मला तर हा फंडा कळला नाही, काय म्हणे पैसे खर्च करायचे नाही. ठीक आहे, जाऊ दे, एक दिवसाने फरक नाही पडत” रिया म्हणाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान झालं आणि रियाच्या लक्षात आलं, शीट, यार moisturizer संपलय, काल आणता आणता विसरलो आपण. आता पैसे मागितले तर ही आई कटकट करेल म्हणून ती  गप्प बसली. थंडी सुरू झालीये नेमकी, आज मेकअप करायचा, बरं आईचा ब्रँड मला सूट होत नाही. पण नकोच, आई खवळेल चांगलीच ! एक दिवस ऍडजस्ट करावंच लागेल.

“रिया, ए रिया, हे फराळाचं देऊन ये गं आत्याकडे. पटकन जा आणि पटकन ये, कुठे पैसे खर्च करू नको बरं.” आईने तिला पिटाळलं.

खाली येऊन रियाने चावीने तिची टू व्हिलर सुरू केली आणि बघते तर काय, पेट्रोलचा काटा ‘आज माझी दिवाळीची सुट्टी आहे’ म्हणत शून्यावरून पुढेच सरकेना. रियाला समजलं, पेट्रोल भरलं नाही, उद्या भरू म्हणत तीन दिवस झाले, आपण गाडी तशीच दामटतोय, आली का पंचाईत ? आईने काही पैसे दिले नाहीयेत, गुगल पे करून पैसे भरायचे म्हणजे हिला मेसेज जाणार, म्हणजे परत आरडाओरडा ! जाऊ दे, पायी जाते आत्याकडे, तरी बरं जरा जवळ रहाते ती. छ्या, ही मात्र माझीच चूक हं अशी मनातल्या मनात रियाने कबुली दिली. 

आत्याकडे डबा देऊन, दमून आलेल्या रियाला तिच्या मैत्रिणी खालीच भेटल्या. एका ऑनलाइन शॉपिंग app वर सेल होता. कुर्ती, जीन्स, टॉप एकदम स्वस्त होते एक दिवसासाठी. खरं दिवाळीत आताच सगळ्याची खरेदी झाली होती. पण सगळ्यांना खरेदी करताना पाहून रियाला मोह आवरेना. तिने न राहवून आईला फोन केला, “आई, दोनच टॉप घेते, प्लिज, करू ऑर्डर ?” आई पलीकडून उत्तरली, “आज नाही, आज खर्च करायचा नाही !” 

रिया जाम वैतागली. तणतणत घरी परतली. दिवसभर धुसफुसणाऱ्या रियाला कधी नेलपेंट आणायचं राहिलं आठवत होतं तर कधी अर्धवट राहिलेल्या डेकोरेशनसाठी आरसे आणायचं विसरल्याचं आठवत होतं. चिडल्यावर कॅडबरी खाऊन राग शांत करणाऱ्या रियाला आज तेही करता येत नव्हतं. 

संध्याकाळी मनासारखी नाहीच झाली तिची तयारी, पण तरी चांगले कपडे घालून ती पूजेसाठी तयार झाली. पूजा सुरू असतानाच कामवाली सरुमावशी रडत रडत आली. “ताई, पोरीला आठवा कालच लागलाय. पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात नेली तर डॉक्टर म्हणाले, पिशवीचं तोंड उघडलंय, डिलिव्हरी होईल. बाळाला काचपेटी लागेल म्हणे, दिस भरले नाहीत म्हणून. कसं करावं? थोडा ऍडव्हान्स द्याल का, लई उपकार होतील. दिवाळी दिली हाये तुम्ही, पर आता हे अचानक आलंय. बघा ओ ताई, जमलं तर द्या ना.” सरुमावशीने हात जोडले.

आई उठली, कपाटातून तीन हजार आणून तिच्या हातावर टेकवले, तिला हळदीकुंकू लावलं, ओटी भरली आणि शिवाय ‘अजुन लागले तर सांग गं’ म्हणत आश्वस्त केलं.

रिया हे सगळं बघून चिडलीच. “आता, आता, गेली ना लक्ष्मी घराबाहेर ? नियम फक्त आम्हालाच का ? आम्ही लहान आहोत म्हणून ?” तिने मनातली आग ओकली .

आईने रियाला जवळ बसवलं. “रिया, तुम्ही कसं वजन कमी करावं, हलकं वाटावं म्हणून डाएट करता, तसं हे आज पैशाचं डाएट असतं. ह्यामागे दोन उद्देश, एक तर planning शिकणे. आपल्याला काय काय लागणार हा विचार, हे नियोजन आधीच केलं ना तर ऐनवेळी धावपळ होत नाही. गाडीत पेट्रोल नसल्यामुळे तू पायी गेलीस हे मी बघितलं गॅलरीतून. वेळेवर गोष्टी न केल्याने त्या emergency होतात, हो की नाही ? 

दुसरा उद्देश म्हणजे संयम ! एवढी खरेदी झाली तरी सेल लागला म्हणून आणखी खरेदी करायची का ? अगं मार्केटिंग strategy असते ती, आपण नाही बळी पडायचं. आता बघ, शांतपणे ,वेळ घेऊन विचार केला तर तुला उद्या वाटेल की गरजच नाहीये त्या extra टॉप्सची, हो की नाही ?” 

रियाने होकारदर्शक मान हलवली तरी चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह आईने ओळखलं होतं. आई पुढे म्हणाली, “रिया, देव ही भक्ती असावी, भीती नाही. कोणी पाहिलंय गं देवाला ? काही चांगल्या सवयी अंगीभूत व्हाव्या म्हणून बऱ्याच गोष्टींना देवाचं नाव देण्यात आलं. पण म्हणून ती अंधश्रद्धा होऊ नये ही काळजी आपणच घ्यायची.

आज सरूच्या पोरीतला, माणसातला देव जर मी नाही ओळखू शकले आणि तिला तिचं बाळ वाचवण्यासाठी नाही मदत करू शकले तर खरा देव अस्तित्वात असेल जरी, तरी तो मला माफ करेल का ? तीच आज लक्ष्मी बनून पूजेच्या वेळी आली आणि तिची तृप्तता झाली म्हणून जाताना तोंडभर आशीर्वाद देऊन गेली. अगं स्वतःला शिस्त लावत, माणसातला देव शोधायचा आणि तो सापडला की ती ज्योत पुढे पुढे न्यायची, हीच तर दीपावली ! आता नाही ना रुसलीस आईवर ?” आईने विचारलं.

‘आली दिवाळी आणि कळली दिवाळी ‘ म्हणत रियाने आईला मिठी मारली आणि पूजेतली लक्ष्मीची प्रतिमा समाधानाने हसली.

लेखिका :  डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर.

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाड्याची सायकल… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ भाड्याची सायकल… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

एक आणा तासवाली भाड्याची सायकल घेऊन, तिच्या दांड्यांच्या त्रिकोणाच्यामधून पलिकडच्या पॅडलवर पाय टाकून सायकल चालवतांना कितिदा पडलो असू त्याला काही गणतीच नाही. पडतांना शाळेच्या गणवेशाची खाकी अर्धी चड्डी चेनमध्ये अडकून किती वेळा टरकली होती, ते आता आठवतसुद्धा नाही. पण चड्डी वीतभर फाटल्याचं आईच्या लक्षात आलं की आपली हातभर फाटायची हे बरोब्बर लक्षांत आहे !! शिवाय सायकलीत अडकून वाकडं-तिकडं पडायला व्हायचं. त्या अष्टवक्रावस्थेतले सुरुवातीचे काही क्षण भ्रमिष्टावस्थेत जायचे. नेमकं काय घडलंय हेच कळत नसे. जरा भान आल्यावर आपल्या हातापायांवर खरचटलंय्, ओरखडे आलेत, डोकं आपटलंय् याचा सुगावा लागायचा !! चेनवर आणि तिच्या कांटेवाल्या चाकावर तेलाच्या बुदलीतून ओतलेल्या लिटरभर मशिन ऑइलचे रांगोळीछाप ठसे हातापायावर, कपड्यांवर उमटायचे. आणि खरंच सांगतो, त्या सगळ्याची गंमतच वाटायची आणि पडायची हौस वाढायची.

पुन्हा पुन्हा पडून सुद्धा त्या लहान वयातली सायकल शिकायची जिद्द, चिकाटी वाखाणण्यासारखी होती. पुढे पुढे टांग टाकून शिटेवर बसता यायला लागलं की दिग्विजयी आनंद व्हायचा. वेळेचं भान सुटायचं. दोन दोन तास सायकल चालवली हे भाड्याचे दोन आणे देतांना समजायचं. सुरुवातीला सायकल शिकवणारा शीट धरून मागेमागे धावत यायचा, त्याचा केवढा मोठा आधार वाटायचा. नंतर नंतर तो मधेमधे शीट सोडतो हे लक्षात यायचं आणि आपण आता आदळणार या भीतीने सायकल लटपटं लटपटं धावायला लागायची.

आणि एकदा सायकलवर प्रभुत्व मिळवलं की हात सोडून सायकल चालवणं, दांडीवर एक, शिटेवर एक आणि स्प्रिंगच्या चापामुळे बोचणार्‍या कॅरियरवर एक, असे तिब्बलशिटचे तीन तीन भिडू एकदम बसून, सर्कशीतले धाडसी प्रयोग करण्याचा आत्मविश्वास वाढीला लागायचा. त्या काळी बहुतेक सगळ्यांकडे हर्क्यूलसची सायकल असायची. काळ्या नाही तर हिरव्या रंगाची. ती विकत घेतांना तिच्यासोबत, धोतरवाल्यांसाठी धोतर पोटरीवर बांधून ठेवणार्‍या स्टेनलेस् स्टीलच्या नाही तर पितळेच्या क्लिपा मोफ़त मिळायच्या. काही तरी मोफत मिळतंय याचं आकर्षण तेव्हाही होतं ! त्या काळी, म्हणजेच १९५५-६० च्या दरम्यान , माझ्या अटकळीप्रमाणे सायकलची किंमत ३५/४० रुपयांच्या आसपास होती. सायकलला दरमहा आठ आणे – म्हणजे वर्षाचे सहा रुपये म्युनसिपाल्टीचा टॅक्स् होता. तो वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच महिन्यात भरावा लागायचा. त्याचा एक अल्युमिनियमचा बिल्ला मिळायचा. तो हॅंडलजवळच्या ब्रेकच्या ताड्यांना नटबोल्ट असायचे, त्यातल्या एका बोल्टवर फिक्स् केला जायचा. पोलिसांचं लक्ष बिल्ल्यावर असायचं. खरं म्हणजे पोलिस हे काही म्युन्सिपालटीचे नोकर नव्हेत. पण नसलेल्या बिल्ल्यात त्यांना संधी दिसायची. टॅक्स् भरायला उशीर झाला तर तीन रुपये दंड भरून तेवढ्याच पैशात – म्हणजे त्या तीन रुपयात बिल्ला मिळायचा. हे काय गणित होतं ते मला अद्यापही सुटलेलं नाही !! लोक टॅक्स् न भरता दंडच भरायचे ! त्यांना दंडात संधी दिसायची !!

संग्राहक – सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पुन्हा उभा राहिला चापेकर बंधूंचा वाडा.” ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “पुन्हा उभा राहिला चापेकर बंधूंचा वाडा.” ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

चिंचवड, पुणे  येथील चापेकर कुटुंबातील तीन तरुणांनी स्वातंत्र्य संग्रमात स्वतःची आहुती दिली. त्यांचा जुना वाडा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दिमाखाने उभा होता. सन १९४८ मधील जळितात तो भस्मसात झाला. आगीतून वाचलेले वाड्याचे लाकूड घरोघरी लोकांनी सरपण म्हणून नेले. भिंतींची माती घरे लिंपण्यास, चुली सारवण्यासाठी लोक घेऊन गेले. वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीची कचराकुंडी झाली आणि ती चक्क बुजवली गेली. वाड्याच्या जागेवर दारूचे  गुत्ते चालू लागले. कित्येक वर्षे त्याठिकाणी दारूचे  गुत्ते चालू होते. ज्या ठिकाणी क्रांतिवीर जन्माला आले त्या ठिकाणी दारू पिऊन लोक झिंगू लागले. गावातील लोकांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती. पण हे सारे बंद करण्याचे धाडस दाखवणारा एकही वीर पुढे येत नव्हता. एक दिवस काही मंडळींनी एकत्र येऊन सन १९९५-९६ च्या दरम्यान उठाव केला. मारामाऱ्या झाल्या आणि दारूच्या गुत्याची त्या जागेवरून हकालपट्टी झाली.

क्रांतिवीर चापेकर बंधूंचा वाडा पुन्हा जसाच्या तसा उभा करण्याचा विचार आणि निर्धार झाला. त्यासाठी स्थानिक मान्यवरांची समिती निर्माण झाली. गिरीश प्रभुणे, डॉ. वैद्य, दत्ता दातार, कांता जाधव, अश्विनी मोकाशी अशा अनेक मंडळीनी चापेकर वाडा पुन्हा पूर्ववत उभा करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला हजारो हात पुढे आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा ठराव करून या पवित्र कार्यासाठी अनुदान मंजूर केले. 

दि. २२ जून १९९७ रोजी चापेकर बंधूंच्या हौतात्म्याच्या शताब्दीदिनी कामास प्रारंभ झाला. जुन्या जाणत्या लोकांच्या मुलाखतीवरून वाड्याचा रचना-आलेख वास्तुरचनाकार संजू फणसळकर यांनी तयार केला.

काम महानगरपालिकेने टेंडरद्वारे एका ठेकेदाराला दिले. कामास प्रारंभ झाला. पाया भरला गेला. परंतु पुढील कामाचे क्लिष्ट व मोठे स्वरूप पाहून ठेकेदाराने काढता पाय घेतला. काम ठप्प झाले. त्यानंतर हे काम करण्यास कोणीही धजावत नव्हता. जुना वाडा, त्याचे जुने स्वरूप विशेषतः लाकडी काम त्यासाठी लागणारे किमती लाकूड, विशिष्ट प्रकारची तक्तपोशी, मेघडंबरी त्यावरील नक्षीकाम हे सारे पुन्हा तयार करावयाचे, या गोष्टी अत्यंत जिकिरीच्या, प्रचंड खर्चाच्या आणि कमीत कमी लाभाच्या होत्या. दगडाचे आणि विटांचे कामही तितकेच बारकाव्याचे आणि प्रमाणबद्धतेचे होते. विहीरही पुन्हा उभी करावयाची होती. सारे काही अवघड होते. राष्ट्रीय प्रेरणेनेच कोणी पुढे आला तरच हे काम पुरे होणार होते.

हे आवाहन पुण्यातील स्थपती नंदकिशोर एकबोटे यांनी स्वीकारले. त्यांनी  फायद्याचा काही विचार केला नाही. चिंचवड येथील प्रसिद्ध दैवत गजानन व संत मोरया गोसावी यांचा आशीर्वाद घेऊन सन २००४ मध्ये  नव्याने कामाला सुरुवात केली. हिरालाल व गणेश हे दोन सुतार व रोकडे नावाचा पाथरवट चालू असलेले काम पाहण्यासाठी आले. आणि  हे काम करण्याचे त्यांनी अतिशय आनंदाने स्वीकारले. 

वाडा पुन्हा उभा करण्यासाठी जुने सागवानी लाकूड मिळवून त्याचे योग्य त्या मापाचे दरवाजे, तुळया, खांब, कडीपाट इ. गोष्टी तयार करण्यासाठी स्वतंत्र मशिनरी खरेदी केली आणि जागेवरच लाकडांची कापणी करून सुताराकडून सर्व गोष्टी जशाच्या तशा बनवून घेतल्या. नेवासा या गावावरून दगड मागविला. व तेथील काही पाथरवटास बोलावण्यात आले. त्यांच्याकडून चौकातील दगडकाम, तुळशीवृंदावन, जोते, तळखडे, दगडी पायऱ्या तयार करून घेतल्या. अशी ही दगडी कामे अतिशय कष्टाची, बुद्धीची आणि नेटाची होती. 

सज्जावरील मेघडंबरी तयार करणे व ती बसविणे, त्यावरील कोरीव कामास उठावदारपणा आणणे, कडीपाटास सुबक आकार देणे, तुळई आणि खांब यामधील ब्रॅकेट्स तयार करून बसविणे, हे सारे काम फारच जिकिरीचे होते. जाड खांबावर फळ्यांचे अस्तर देऊन त्यांची जाडी प्रमाणबद्ध ठेवून त्यावर तुळया व मध्ये कडीपाट बसविणे हे साधे दिसले तरी कौशल्याचे काम होते. 

लहान आकाराच्या चपट्या विटा बाजारात उपलब्ध नव्हत्या. म्हणून ठराविक आकाराच्या विटा तयार करण्यासाठी वीटभट्टी सुद्धा जागेवरच लावण्यात आली होती. छपरासाठी लागणारी गोल नळीची कौले कोठेच मिळत नव्हती. हे सर्व साहित्य वीटभट्टीतून तयार करण्यात आले. वीटकाम इतके सुबक तयार करण्यात आले,आणि विटांचे सांधे एकमेकांस बरोबर जुळवून अशा पद्धतीने बसविण्यात आले की त्यातील सिमेंट कोठेही दिसत नाही. दर्शनी भिंतींचा रंग पिवळ्या मातीसारखा दिसणे गरजेचे होते. ही रंगसंगती साधण्यासाठी रंगांचे विविध नमुने आणून त्यांची मिश्रणे तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. 

चौक, सोपे, आतील दालने, चौकातील वृंदावन, चौकात पूर्ण दगडी फरशी, अत्यंत रेखीव जोती, जोत्यांना ठिकठिकाणी बसवलेल्या कड्या, चापेकरांनी दुधासाठी पाळलेल्या गाई-म्हशी बांधण्यासाठीचा गोठा, सज्जा, सज्जा वरील मेघडंबरी, दरवाजा, बाजूच्या देवड्या, आतील पायऱ्या, असा तीनमजली वाडा अवघ्या काही महिन्यांत उभा राहिला. 

— चिंचवड गावात रामआळीत हा पूर्वाभिमुखी वाडा उभा आहे. वाड्यासमोरून उत्तर-दक्षिण असा गावचा हमरस्ता आहे. वाड्याच्यासमोर उभे राहिल्यावर दरवाजावरील गणेशपट्टी आणि वरील मेघडंबरीयुक्त सज्जा पाहून मन प्रसन्न होते. वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर दगडी फरशीचा चौक, मधोमध असलेले तुळशीवृंदावन, चार सोपे, त्यावरील दोन मजले, सुंदर असे लाकूडकाम पाहिल्यावर खरोखरच चापेकरांचा हा वाडा नवा असला तरी जुन्या घटनांनी मात्र त्या काळातच घेऊन जातो. त्यांची त्या वेळची पितळी भांडी एका फडताळात ठेवलेली दिसतात. तर बाहेरच्या सोप्यात देव्हाऱ्यातील त्यांच्या पूजेच्या देवाचे दर्शन घडते. समोरच्या सोप्यात क्रांतिवीर दामोदर चापेकर यांचा पुतळा पाहिल्यावर क्रांतिदिन मनःचक्षू पुढे साक्षात उभा राहतो. वाड्याचे तिन्ही मजले पाहिल्यावर आणि परसातील विहीर पाहून नव्या उभ्या राहिलेल्या वाड्याचे मंगलमय प्रतिबिंब विहिरीतील पाण्यात दिसू लागते आणि त्याचक्षणी चापेकर बंधूंचा ब्रिटिशांच्या दडपशाही आणि अत्याचार यांच्या विरुद्ध दिलेला लढा आणि त्यातून प्राप्त झालेले वीरमरण याचा ज्वलंत इतिहास उभा राहतो.

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 114 – गीत – एक लहर कह रही है कूल से ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण गीत – एक लहर कह रही है कूल से।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 114 – गीत – एक लहर कह रही है कूल से ✍

एक लहर कह रही है कूल से

बँधे हुए हो क्यों दुकूल से।

 

एक किरन आ मन के द्वारे

अभिलाषा की अलक सँवारे

संभव कहां अब अपरिचित रहना

बार-बार जब नाम पुकारे।

 

सोच रहा हूं केवल इतना,

क्या मन मिलता कभी भूल से।

 

इसी तरह के वचन तुम्हारे

अर्थ खोजते खोजन हारे

मौन मुग्ध सा अवश हुआ मैं

शब्दवेध की शक्ति बिसारे

 

सोच रहा हूँ केवल इतना,

प्रश्न किया क्या कभी भूल से

भ्रमर बँधे हैं क्यों दुकूल से।

 

एक लहर कह रही है कूल से

बँधे हुए हो क्यों दुकूल से।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – लघुकथा ☆ बालदिवस विशेष – “कसक…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ बालदिवस विशेष – “कसक…” ☆ श्री कमलेश भारतीय 

वह घर आया और रूठ कर दादी के पास पहुच गया । उसकी बाजू पकड़कर बोला- दादी , फोन पर मेरी पापा से बात करवा दे।

– कयों ?

– दादी , कहां रहता है , मेरा पापा ?

– वो तो काम के लिए दूर रहता है ।

– बुला उसे अभी ।

– कयों ?

– मैं अभी जाॅय के साथ खेल रहा था । उसका पापा आया और हम दोनों को कार में घुमाने ले गया ।

– फिर क्या हुआ ?

– जब मेरे पापा के पास गाड़ी है , तो मैं जाॅय के पापा की गाड़ी में सैर क्यों करूं ?

– बेटे , तेरे पापा नहीं आ सकते ।

– कह दे फिर मैं उनसे बात नहीं करूंगा ।

-नहीं बेटे , ऐसे नहीं कहते ।

– बस फिर, करवा दे मेरी बात । वह अपनी जिद्द पूरी करके ही माना । उसके बाद सपनों में खो गया और पापा की गाड़ी में सैर करने निकल गया ।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares