निरोप : विरक्तिपर विचारांची भावमधुर कविता – अमिता कर्णिक-पाटणकर
सिद्धहस्त साहित्यिक-कवी डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची ‘ निरोप ‘ ही कविता वाचली व प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकलीही. तेव्हापासून एका नितांतसुंदर काव्याचा आनंद अनुभवते आहे.
कवितेची सुरुवातच ” कधी अचानक कुणाही नकळत निघूनिया जावे, मागे उरले ते न आपुले कशास गुंतावे” ह्या निरोपाच्या ओळींनी होते. हा निरोप इहलोकाचा आहे हे लख्खपणे सामोरे येते आणि थोडी उदासी, थोडी विषण्णता जाणवण्याच्या अपेक्षेने आपण पुढे वाचू लागतो. कविता सहजपणे उलगडत जाते ती अशाच निवृत्तिपर शब्दांनी. या जगातून निघून जाण्याआधीची नितळ आणि निखळ मनोऽवस्था पारदर्शी दिसते.
स्थावर- जंगम संपत्ती तर सोडाच, हा देहही आपल्या मालकीचा नाही; मग त्याचा मोह कशासाठी धरावा हा मूलभूत प्रश्नच कवी विचारतो. ” फल आशा न अपुल्यासाठी जगताला अर्पिले ” ही ओळ तर गीतेच्या निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञानच! आयुष्य जसे समोर आले तसे जगण्याचे, कष्ट-हालअपेष्टा सहन करण्याचे बळच ह्या मनोवृत्तीतून मिळाले असणार. म्हणूनच ‘ इदं न मम ‘ – ” माझे ‘नाही’ म्हणावे ” असे कवी सहजगत्या म्हणतो. जीवन क्षणभंगुर आहे हे एकदा आकळले की मग त्यातील भावभावना, कामनावासना व्यर्थ वाटू लागतात. मग ” मुमुक्षु होऊन ब्रह्म्यालागी बंध झुगारून द्यावे ” अशी जणू जीवाला ओढ लागते. अंतिम चरणातही बंदिस्त आयुष्याची घुसमट कवी मांडतो पण शेवटच्या ओळीत मात्र कविता वळण घेते – “आत्मा असता अमर तयासी नसणे कसे म्हणावे ” असे म्हणत एक वेगळीच उंची गाठते. आणि हेच या कवितेचे सार आहे.
जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांना जोडणारा पथ म्हणजे जीवन. या पथावर अनेक खाचाखळगे असतात तसेच सुखद थांबेही असतात. हे सर्व भोगत आणि उपभोगत मार्गक्रमण करायचे असते. हा मार्ग शेवटच्या मुक्कामाकडेच जातो हे अटळ सत्य सर्वांनाच पचवता येत नाही. मृत्यू हा दुःखद अंत आहे हीच भावना प्रायशः असते. इथेच डॉ. श्रोत्रींचं वेगळेपण जाणवतं. कवितेत कुठेच भय दिसत नाही, संध्याछाया ह्रदयाला भिववत नाहीत, दुःखाचे उमाळे फुटत नाहीत. उलट, विरागी योग्यांची अनासक्ती, तृप्तीच जाणवते. हे अजिबात सोपं नाही. वास्तविक साधूसंतांची हीच शिकवण आहे, पण सर्वसामान्य जनांना आचरणात आणणं अवघड वाटतं. डॉ. श्रोत्रींनी मात्र हे सहज अंगीकारलं आहे असं कवितेत ठायी ठायी दिसून येतं.
आयुष्यात सुखदुःखांना सोबत घेऊनच मार्ग चालावा लागतो. पण या मार्गावर एक एक ओझं उतरवत, विरक्त होत होत पुढे चालत राहिलं तर पैलतीर दिसू लागल्यावर आपण मुक्त, निर्विकल्प होऊन ‘निरोपा’साठी मनोमन तयार असतो. आपला नश्वर देह मागे सोडावा लागला तरी खरा साथी ‘ आत्मा ‘ चिरंतन आहे, अमर्त्य आहे हा दिलासा मिळाल्यावर भीतीला वावच उरत नाही. अविनाशी आत्म्याचा हा अनंताचा प्रवास निरंतर चालूच राहतो. तो संपत आल्यासारखा वाटला तरी खऱ्या अर्थाने कधी संपणार नसतोच….तो केवळ एक निरोप असतो – पुन्हा भेटण्यासाठी घेतलेला निरोप!
ऐहिक जीवनाचं वैय्यर्थ दाखवूनही सकारात्मक विचार मांडणारी ‘निरोप’ ही कविवर्य डॉ. निशिकांत श्रोत्री यांची कविता म्हणूनच मला अतिशय उदात्त आणि उत्कट वाटली!
नशीब ही गोष्ट आहे की नाही ह्याबद्दल कायमच मतमतांतरे असतात. परंतू एक गोष्ट नक्की, तुम्ही कुठे जन्म घेता हे तुमचं नशीबच ठरवतं. आणि एकदा आपण ज्या घरात वा घराण्यात जन्म घेतला, त्या घराण्याचा आपल्याला अभिमान वाटतो. ह्या घराण्यातील आपल्या थोर पूर्वजांचा आपण आदर्श घेतो, त्यांच्या वाटेवरुन चालायचा प्रयत्न करतो.
पुरुषांना आपलं घराणं हे एकदाच, म्हणजे जन्मजातच मिळतं. परंतू स्त्रिया थोड्या जास्त नशीबवान, त्यांना जन्मजात एक घराणं तर मिळतंच, पण विवाहानंतर दुसरं घराणं पण स्वतःच्या मनाने निवडायला मिळतं.——
१२ नोव्हेंबर— म्हणजे आज सगळ्यांसाठीच आदर्शवत असणाऱ्या आमच्या पूर्वजांची जयंती—–
—आज सशस्त्र क्रांतिकारक, समाजसेवक, तत्वनिष्ठ, अशा सेनापती बापट ह्यांची जयंती. ते आमचे पूर्वज आहेत ह्याचा आनंद, अभिमान प्रत्येक बापट व्यक्तीला वाटतोच वाटतो.
सेनापती बापटांची प्राथमिक ओळख अशी —– ते महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे पुत्र. त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना मानाची म्हणून मान्यता पावलेली संस्कृतची ‘ जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती ‘ मिळाली होती. त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला—-
— पण तिथेच देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न आणि चक्र त्यांच्या डोक्यात फिरायला लागले. आपली मातृभूमी परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपण प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. या विचाराने ते इतके झपाटून गेले की , कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच १९०२ मध्ये त्यांनी आपल्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी पुढीलप्रमाणे शपथ घेतली. ती त्यांच्याच शब्दांत अशी —-” मी आजपासून देशासाठी आजीवनकाया, वाचा, मनाने झटेन आणि त्याची हाक येताच देशसेवेसाठी धावत येईन. या कामी मला देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून याच भरतखंडात जन्म घेईन व अपुरे राहिलेले काम करून दाखवीन,“.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. अलीपूर बॉंब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इ. स. १९२१ पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.
इ. स. १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना “ सेनापती “ म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहवासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. संस्थानांतील प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तर काळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.
कुठल्याही सुधारणेची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून करावी, कारण सांगणं सोप्पं पण आचरणं कठीण, हे सेनापतींचं ठाम मत होतं. म्हणून नोव्हेंबर १९१४ मध्ये त्यांना मुलगा झाल्यावर, त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले.
एप्रिल १९१५ मध्ये ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या ‘ चित्रमय जगत ‘ या मासिकात नोकरी करू लागले.
त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत.
पुढे सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या ‘संदेश’ नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. ‘ झाडू-कामगार मित्रमंडळ ‘ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून, भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.
अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती. त्यांना भयंकर यातना सहन कराव्या लागल्या होत्या हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी, डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालवली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’ राजबंदी मुक्ती मंडळ ‘ स्थापन केले होते. इ.स.१९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भाषेच्या दृष्टीने एक अत्यंत मोलाचे काम श्री. पां.म.बापट यांनी केले. योगी श्रीअरविंद यांच्या ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे. श्रीअरविंद आश्रम, पुडुचेरी यांच्यामार्फत हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सेनापतींनी लिहिलेल्या या काव्यपंक्तींवरून त्यांचा जाज्वल्य महाराष्ट्राभिमान दिसून येतो. महर्षी अरविंद घोष यांच्या क्रांतिकारी व आध्यात्मिक अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा सेनापती बापटांवर प्रभाव होता. महर्षी अरविंदांच्या
‘दी लाईफ डिव्हाइन‘ या ग्रंथाचा त्यांनी ‘ दिव्य जीवन ‘ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. याखेरीज ‘ चैतन्यगाथा ’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. संस्कृत, इंग्रजी व मराठी या भाषांतून त्यांनी काव्यरचना केली आहे. हैदराबादच्या तुरुंगात सेनापती बापट यांनी Holy Sung (होली संग) या नावाचा इंग्रजी काव्यसंग्रह लिहिला.
अशा प्रकारे सशस्त्र क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, तत्त्वचिंतक अशा विविध नात्यांनी भारतमातेची व भारतीय जनतेची सेवा करणारा हा सेनापती बापट यांचा २८ नोव्हेंबर, १९६७ रोजी मृत्यू झाला.
त्यांचे पारनेर मधील घर “ सेनापती बापट स्मारक “ म्हणून ओळखले जाते.
परवाचीच गोष्ट…सुट्टीचा दिवस होता. नवऱ्याच्या, मुलाच्या आँफिसची गडबड नव्हती म्हणून बाहेरच्या बाल्कनीत कॉफीचा मग घेऊन कुंडीत लावलेली झाडे बघत निवांत कॉफी पीत होते. एवढ्यात अचानक एका कोपऱ्यातल्या कुंडीतून डोकावणाऱ्या नाजूक लालबुंद फुलांनी माझं लक्ष वेधलं. मी जवळ जाऊन पाहिलं तर त्यात लावलेल्या निवडुंगाला फुलं आली होती. मी जाम खूश झाले.
मला आठवलं, एक-दीड वर्षांपूर्वी माझ्या भाच्यानं तीन, चार कॅक्टसच्या कुंड्या आणल्या होत्या. मला झाडांची आवड आहे. पण त्या कुंड्या आतील बाल्कन्यांमध्ये ठेवायला सासूबाईंनी कडाडून विरोध केला.– ” हे बघ ती काटेरी झाडं बाहेर ठेव हं.” – खरं तर मला रागच आला होता आणि पतिदेव व माझा मुलगा, जे आधीच झाडांवरुन मला डिवचायची संधी सोडत नाहीत, त्यांनी सासूबाईंचीच “री” ओढली. मी मग वाद न घालता बाहेर शोची झाडं आहेत तिथं त्या कुंड्या नेऊन ठेवल्या.
आज त्यातील दोघांना फुलं आली होती. एकाला टोमॅटो रेड, दुसऱ्याला गर्द गुलाबी. ती फुले जणू मला सांगत होती, ‘ अगं, आम्हीही फुलतो कधी तरी… कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी…’
माझं मन विचारात मग्न झालं. निवडुंग.. अगदी काटेरी. नुसती पाने.. खूप काटे, कधीतरी आली तर फुले. त्याला ना रूप ना रंग असंही काहीजण म्हणतात. पण हाच निवडुंग वाळवंटात तीव्र उन्हाचा दाह सोसत ताठ मानेने उभा असतो.. हसत हसत.. भवताली वाळूचा महासागर… पाण्याचा अभाव, उन्हाचा पेटता वणवा…. .म्हणूनच आपल्या गरजा कमी करण्यासाठी फांद्या, उपफांद्या नाहीत, विस्तार नाही— जशी आर्थिक कमतरता असणारे लोक आपल्या गरजा कमी करतात ना, अगदी तसंच !
…तेवढ्यात मला आमच्या भांडी घासणाऱ्या सीताताईंची हाक आली. त्यांची म्हैस व्यायली म्हणून त्या आमच्यासाठी दुधाचा चीक घेऊन आल्या होत्या. मी किटलीत म्हशीसाठी गहू घालून दिले तर किती हसल्या. म्हैस व्यायली तर किती आनंदल्या होत्या. त्यांचे आयुष्य कष्टाचं… वयाच्या दहाव्या वर्षी आईबापाने लग्न लावून दिले. नवरा पंचवीस वर्षांचा, बीजवर… तशी सीता काळीसावळी पण ठसठशीत, नाकीडोळी नीटस. जरा थोराड बांध्याची. पण आईबापाकडं अठरा विश्व दारिद्रय. हा जावई जरा बराच..गवंडी काम करायचा. घरचं पाच-सहा एकर रान होतं. सीताला सवतीचा दोन वर्षांचा मुलगा असल्याचं लग्नाच्या दिवशी समजलं. आता काय ..सांभाळावं तर लागणारच. चार- पाच वर्ष बरी गेली. सीता तीन महिन्यांची गरोदर होती, आणि तो काळा दिवस उजाडला. साप चावल्याचं निमित्त होऊन नवरा तडफडून जागीच गेला. पाठोपाठ सासूही गेली आणि तिचा आधार गेला.
धाकट्या दीर-जावेनं तिला घराबाहेर काढलं. आधीच गरोदर, पदरी सावत्र मुलगा. नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडली. माहेरी आली. आईबरोबर बाहेर चार घरी धुणी भांडी करू लागली. तिलाही मुलगा झाला. चार वर्ष आईच्या आसऱ्याला बरी गेली. पण भावांची लग्न झाल्यावर त्या दोन भावजया तिच्याशी पटवून घेईनात. दरम्यान तिचे आईवडिलही गेले आणि शेवटी तिला माहेर सोडावं लागलं.
ती तशी जिद्दीची. एका बांधकामाच्या कामावर वॉचमनची नोकरी मिळाली. सामानाची चोवीस तास राखण करण्यासाठी रहाण्याचीही सोय झाली होती. डोक्यावर छप्पर आलं. दोन्ही मुलं मोठी होऊ लागली. धुणी-भांडी, केर-फरशीबरोबर कुठं स्वयंपाकाची कामेही मिळाली. आता चार पैसे हातात राहू लागले. दोन्ही मुलगे ग्रँज्युएट झाले. कारखान्यांमध्ये कामाला लागले.
यथावकाश दोन्ही मुलांची लग्न झाली.आता सीताचा जीव भांड्यात पडला. आता सुखाचे, विसाव्याचे दिवस आले असे तिला वाटले. पण दोन्ही सुनांना सासू घरात नकोशी झाली होती. तिला मुले म्हणाली, ‘ आमचा नाईलाज आहे. काय करावं समजत नाही.’ सीता काय ते समजली. पुन्हा एकदा ती आपल्या लोकांच्याकडून नाकारली गेली होती.
सुदैवाने, ती अजून चार घरी काम करीत होती. ती दोन-तीन साड्या आणि तिच्या विठुरायाचा फोटो घेऊन घराबाहेर पडली. त्यावेळी आमच्याकडेच आली. चार दिवस राहिली. सासूबाई,आम्ही सर्वजण तिला आमच्याकडेच रहायचा आग्रह करत होतो, पण सीता म्हणाली, “आदुगरच लई उपकार हायती तुमचं. हात पाय हलत्यात तवर भाईरच रहावं म्हनते.. अन, अडीनडीला तुमी हायसाच की…”
मी तर अवाक् झाले. तिचा आत्मविश्वास पाहून आश्चर्य वाटले. त्या परिस्थितीतही ती समाधानी होती
..माझ्या एका मैत्रिणीचं शेत आमच्या घरापासून जवळच होते. तसे दीड दोन एकरभरच, पण पडीकच जागा. मी मैत्रिणीला शब्द टाकला. तिनं सीताला तिथं रहायची आनंदानं परवानगी दिली. सीताचं नवीन जीवन सुरू झालं. शेतात एक जुनाट झोपडी होती. सीताचा एकटीचा संसार नव्याने सुरू झाला. मी तिला गरजेपुरती भांडी दिली. स्टोव्ह दिला. ती पुन्हा जोमानं कामं करू लागली. सदा हसतमुख, कामाचा कंटाळा असा नाहीच . मला नवल वाटायचे .
सीताचा हात फिरला आणि झोपडीचा जणू उबदार महालच झाला. शेणानं सारवलेलं अंगण, अंगणात रेखीव रांगोळी. दारात तुळस फुलली. सीतानं फावल्या वेळात भोवतीचा परिसर स्वच्छ केला. तिथं वाफे करून भाज्या लावल्या. मेथी, कोथिंबीर, मुळा, वांगी, लाल भोपळा, माठ. आम्ही तर थक्क झालो. माझी मैत्रिण तर जागेचा कायापालट बघून जाम खूश झाली. तिने भाजी विकून मिळेणारे पैसे स्वतः सीतानेच घ्यायचे अशी अट घातली.
— ” वैनी, म्या टाइम भेटला म्हून केलं समदं. आवं, आता हीच माजी लेकरं, .पैशे नकोत मला. ते तुमीच घ्या. “
मग मात्र मैत्रीण हट्टाला पेटली. मग सीताचा नाईलाज झाला. आता आमच्या सोसायटीत तिचीच भाजी सर्वांकडे असते. आम्ही दोन, तीन मैत्रिणींनी मिळून तिला एक म्हैस विकत घेऊन दिली. तीच ‘ चंद्रा ‘ व्यायली. तोच दुधाचा चीक घेऊन सीता आली.
सदा चेहऱ्यावर हास्य.. परिस्थिती कशीही आली तरी जिद्दीनं सामना करायचा, हे कुणी शिकवलं या सीताला. आनंदाचं हे दान देवानेच तिला दिलं असावे. म्हणूनच मला तिच्यात आणि निवडुंगात साम्य आढळलं..।—-
– हा काटेरी , काहीसा वेडावाकडा, सर्वांनी नाकारलेला निवडुंगही जगतो, वाढतो… परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी पण नेटानं जगायचे त्याने ठरविलेले असते. मग कधीतरी तो फुलतो. सर्वांना आनंदगाणे सांगतो.
जीवनात अशी काही सीतासारखी माणसं असंतात. त्यांच्या गालावरचे हास्याचे गुलाब सदा फुललेले असतात.. मग हास्याचे,आनंदाचे कारंजे त्यांना का नाही न्हाऊ घालणार ?
आपल्या परंपरेत पूर्वी वेगळे दिन वगैरे साजरे केले जात नसत …. परंतू तरीही खूप पूर्वी श्री रामदास स्वामींनी आवर्जून सांगितलेली मित्र लक्षणे मात्र, आज “फ्रेंडशिप डे“ आवर्जून साजरा करतानाही नक्कीच ध्यानात ठेवावीत अशी आहेत ——
मित्र तो पाहिजे ज्ञानी। विवेकी जाणता भला।
श्लाघ्यता पाहिजे तेथे। येहलोक परत्रहि॥
उगाचि वेळ घालाया। नासके मित्र पाहिले ।
कुबुद्धि कुकर्मी दोषी। त्यांचे फळ भोगावया॥
सारीचे मित्र नारीचे। चोरीचे चोरटे खवी।
मस्तीचे चोरगस्तीचे। कोटके लत पावती॥
संगदोषे महादुःखे। संगदोषे दरिद्रता।
संगतीने महद्भाग्य। प्राणी प्रत्यक्ष पावती॥
संग तो श्रेष्ठ शोधावा। नीच सांगात कामा नये।
न्यायवंत गुणग्राही। येत्नाचा संग तो बरा॥
रचना : श्री समर्थ रामदासस्वामी महाराज
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..? – भाग – 2 लेखक – डॉ. सचिन लांडगे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
(ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..) इथून पुढे —–
सगळ्या डॉक्टरांनी खोऱ्यानं पैसा ओढण्याचा जमाना गेलाय.. खोऱ्या घेऊन बसलेले फक्त पाच-दहा टक्के डॉक्टर उरलेत, आणि समाजाला तेवढेच दिसतात.. अलीकडं नवीन बाहेर पडलेल्या बहुतांश डॉक्टर्ससाठी खोऱ्या तर नाहीच आहे, उलट पेशंट्स मिळणं मुश्किल झालंय.. त्यात तुम्ही स्पेशालिस्ट / सुपर स्पेशालिस्ट असाल तर आणखी अवघड आहे. पिताजींचा पैसा असेल तरच निभावून नेता येतं, नाहीतर मग कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन होण्याशिवाय पर्याय नाही..
सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सना तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन व्हावंच लागतं, कारण त्यांना लागणाऱ्या मशिनरीज ची कोटीतली इन्व्हेस्टमेंट ते सुरुवातीला करूच शकत नाहीत.. मग हेच कॉर्पोरेट हॉस्पिटल्स डॉक्टरांना नोकरीवर ठेऊन खोऱ्यानं ओढताहेत.. खोऱ्या आता तिकडे शिफ्ट झालाय, असं आपण म्हणू शकतो.. म्हणून तर बडे उद्योगपती आणि उद्योगसमूह आता हेल्थकेअर सेक्टर मध्ये उतरू लागलेत. फार्मा कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्यांची चलती सुरू आहे.. गेल्या दहा वर्षात हा बदल इतक्या झपाट्यानं झालाय की पुढच्या दहा वर्षात परिस्थिती काय असू शकते हे आपण इमॅजिनच नाही करू शकत !!
ह्या व्यवसायातून मिळणाऱ्या Job satisfaction चं गणित देखील बिघडलंय.. ‘डॉक्टर तुमच्या हातात आमचा पेशन्ट दिलाय, तुम्ही प्रयत्न करा, बाकीचं आमचं नशीब ‘ असं म्हणणारे नातेवाईक आता उरले नाहीत.. एखादी केस हँडल करत असताना तुम्हाला होणारा स्ट्रेस, आणि तो पेशन्ट बरा झाल्यावर तुम्हाला मिळणारं समाधान, याचं गुणोत्तर व्यस्त झालंय. त्यातच ‘ मग डॉक्टरनं काय फुकट केलं काय? ‘ अशा पद्धतीची सर्टिफिकेटस् तुमचा सगळा उत्साह पहिल्या एक दोन वर्षातच घालवतात..
आता, जरी वैद्यकीय तपासण्या आणि उपकरणं अद्ययावत झाली असली तरी प्रत्येक केसमधली “सोशल रिस्क” खूपच वाढलीये.. त्यामुळं कितीतरी डॉक्टर्सना कमी वयातच ब्लड प्रेशर , डायबेटीस, हृदयरोग, arthritis, spondylosis अशा आजारांचा सामना करावा लागतोय. Quality of life आणि सरासरी आयुर्मान घटतेय.. क्रिटिकल केअर मधल्या डॉक्टर्सचं morbidity आणि mortality चं प्रमाण तर लक्षणीयरित्या वाढलंय.. हे इमर्जन्सी हँडल करणारे डॉक्टर्स तर रोज खूप मानसिक थकतात.. किंवा मग लवकर त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, किंवा काही दिवसांनी क्रिटिकल पेशंट्स घेणे बंद करतात, किंवा खूप साऱ्या व्याधी स्वतःला घेऊन लवकर मरतात.. “प्रोफेशनल हझार्ड” आहे हा.. सर्वसामान्य लोकांना त्याची कल्पना येणं शक्यच नाही.. खूप प्रयत्न चालू असलेल्या पेशंटच्या साधं लॅब टेस्टस जरी आपल्या मनासारख्या आल्या नाहीत तरी मन बेचैन होतं.. बेडवर शांत झोपलेल्या पेशंटची दोन सेकंद पल्स जरी लागली नाही , तर अंगात जी भयाची वीज चमकून जाते त्याची काय किंमत पैशात होईल का? साईडरूम मध्ये गाढ झोपलेलं असतानाही मॉनिटरच्या अगदी छोट्याश्या अलार्मने पण जाग येते, आणि दिवसभरात जो थोडा थोडा “ऍड्रेनॅलीन सर्ज” होत राहतो, आणि शरीरावर विपरीत परिणाम करत राहतो, त्याची भरपाई पैशांत होऊच शकत नाही..
डॉक्टर स्त्रिया तर जास्तच भावनिक असतात. नवरा पण डॉक्टर असेल तर तो तिचे ताण समजू तरी शकतो, पण नॉनमेडीको व्यक्तीला तिचे ऑन-कॉल त्रास देतात, इमर्जन्सीज नकोसे वाटतात, मूड स्विंगज् टॉलरेट होत नाहीत.. हॉस्पिटल मधून एक फोन आला अन हिचा मूड एवढा का गेला, हे सांगितलं तरी कळू शकत नाही.. आपली जवळची नॉनमेडीको व्यक्तीच सर्वकाळ समजून घेऊ शकत नाही, तर मग परक्या समाजाकडून तर अपेक्षाच नाही..
तुम्हाला वाटेल , ‘काय हा सगळं निगेटिव्हच बोलतोय’, पण बाहेरच्या अनेक देशांत देखील मेडिकल फिल्ड हे least preferred क्षेत्र आहे.. युरोपियन देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई सगळीकडे MBBS करण्यापेक्षा इतर कोर्सेस निवडण्याला जास्त प्राधान्य आहे.. तरी तिथं डॉक्टरला मारहाण शिवीगाळ हा भाग अजिबातच नाहीये!.. पण जिथं ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ला खूपच जपलं जातं, तिथं हे असं अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचा अभ्यासक्रम शिकण्यात आयुष्याची बारा पंधरा वर्षे घालवायची, प्रत्येक पेशन्ट ट्रीट करताना अथवा ऑपरेशन करताना मरणाचा स्ट्रेस घ्यायचा, ऑन कॉल्स इमर्जन्सीज ह्यात स्वतःचं आयुष्य बेभरवशाचं करून घ्यायचं, कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाची वाताहत करायची, आणि personal happiness बाजूला ठेवून मन मारून जगायचं, हे असलं आयुष्य कोणाला आवडणार आहे बरं? त्यामुळं बऱ्याच प्रगत देशातली मुलं MBBS घेतच नसल्यामुळं भारतातून डॉक्टर्स आणि नर्सेसना अशा ठिकाणी मागणी आहे..
असो..
हॉस्पिटलमधल्या दुःखमय आणि निगेटिव्ह वातावरणात दिवसभर वावरून देखील तिथल्या कुठल्याच स्ट्रेसचं प्रतिबिंब घरात पडू न देणं, आणि घरच्या प्रापंचिक गोष्टी हॉस्पिटलमध्ये येऊ न देणं यासाठी प्रत्येक डॉक्टर झगडत असतो… डॉक्टर हा सुद्धा एक माणूसच आहे.. एक बटन दाबलं आणि ‘मूड चेंज’ केला, असं होत नाही.. आणि ते सोपंही नाही.. मग ‘भावनिक फरफट’ होत राहते.. त्यामुळं हळव्या स्वभावाच्या माणसाचे तर अजूनच हाल होतात.. स्थितप्रज्ञता ही गोष्ट प्रत्येकालाच जमेल असं नाही आणि ती प्रत्येकवेळी जमेल असंही नाही..
असो..
समाजात ‘रिस्की जॉब्ज’ बरेच आहेत, जसं की वैमानिक, सैनिक, फायर फायटर, वगैरे.. पण आता ते बऱ्यापैकी Predictable आणि safe आहेत, आणि समाजातही त्यांच्याबद्दल इज्जत आहे.. पण डॉक्टरच्या हातात कोणाच्यातरी जीवन-मरणाचा प्रश्न रोजच असतो.. एखाद्याचा जीव वाचवणे यासारखे ‘नोबल’ काम आणि त्यातून मिळणारा आनंद कुठलाच नाही.. पण कॉम्प्लिकेशन्स झाले तर मात्र तुमचं काही खरं नाही, अशी परिस्थिती असेल, तर यासारखं discouraging ही काही नाही.. तुम्हाला भयमुक्त वातावरणात काम करता येत नसेल, तर त्या job satisfaction ला ही काहीच अर्थ उरत नाही.. फुटबॉल मॅचमध्ये जसं गोलकीपरने किती गोल वाचवले ह्यापेक्षा त्या मॅचमध्ये किती गोल झाले हेच लक्षात राहतं, तसंच एखाद्या डॉक्टरच्या हातून किती लोक मरणाच्या दारातून बरे होऊन गेले यापेक्षा, दगवलेला एखादा रुग्ण डॉक्टरची आतापर्यंतची सगळी प्रॅक्टिस, मेहनत आणि नाव पाण्यात घालवू शकते.. आणि तेही, ज्या गोष्टी डॉक्टरच्या हातात नाहीत त्यासाठी!!
कॉम्प्लिकेशन्स हे कधीही होऊ शकतात, बऱ्याचदा ते डॉक्टरच्याही हातात नसते. फारतर त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे एवढंच ते करू शकतात.. याची समज हळूहळू कमी होत चालली आहे.. कितीही मेहनत घेऊन देखील रुग्णाला काही कमीजास्त झालं तर, डॉक्टरांना बोलणी ऐकून घ्यावी लागतात, बदनामी सहन करावी लागते, प्रसंगी तोडफोड आणि मारहाणीलाही सामोरं जावं लागतं.. आणि कुठल्याही डॉक्टरसाठी ते खूपच humiliating आहे.. असो..
एकीकडे हॉस्पिटल टाकण्यासाठी लागणारी प्रचंड इन्व्हेस्टमेंट, सरकारी परवानग्या व अटी, इन्श्युरन्स कंपन्यांचे Eligibility criteria, ग्राहक सुरक्षा कायद्याचा (CPA चा) जाच, हे असतानाच वर समाजात वाढत असलेली असुरक्षा, सरकारी अनास्था, मारहाणीची किंवा बदनामीची सतत टांगती तलवार, रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष, समाजाचा असंतोष, त्यात पुढाऱ्यांचा अन् गुंडांचा उपद्रव.. आणि वर हॉस्पिटलमधले वाढते ताणतणाव, यातून स्वतःच्या कौटुंबिक सुखाची वाताहत, अशा निराशाजनक वातावरणात आयुष्याची ऐन तारुण्यातली बारा पंधरा वर्षे होळी करून डॉक्टर नेमकं कशासाठी व्हायचंय? याचा विचार इथून पुढे MBBS ला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी नक्कीच करावा.. सध्याची परिस्थिती थोडीतरी बरी आहे, आणि अजूनही हे क्षेत्र डिमांड मध्ये आहे.. आणि आमच्या पिढीपर्यंत तरी आम्हाला नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून डॉक्टर असल्याचा ‘Proud’ वाटावा अशी परिस्थिती होती.. पण पंधरा वीस वर्षांनंतरचा काळ देखील असाच ‘Proud’ वाटावा असा असेल, की हे क्षेत्र फक्त कॉर्पोरेट जॉबसारखंच फक्त एक प्रोफेशन उरलेलं असेल, ते सांगता येत नाही.. टिकून राहण्यासाठीचा संघर्ष तर समाजात सगळ्यांनाच करावा लागतोय, मग तो शेतकरी असो की इंजिनिअर.. मला तेच म्हणायचंय की डॉक्टर झाल्यावर आपलं लाईफ सेट होईल, पैशांचा पाऊस वगैरे पडेल अशा विचारातून जर कोणी इकडं येणार असेल तर मात्र परिस्थिती आता पूर्वीइतकी गालिचामय उरलेली नाहीये.. बाहेरून कदाचित लक्षात नाही येणार, पण इथंही तुम्हाला संघर्ष अटळ आहे..
कोणीही एखादा जर Highly educated आणि Well qualified असून देखील एक सुखी समाधानी आयुष्य जगू शकणारच नसेल, तर त्याला, “हा एवढा अट्टाहास आपण कशासाठी केला?”, हा प्रश्न आयुष्याच्या शेवटी पडण्यापेक्षा सुरुवातीलाच त्याचा विचार केलेला बरा!
शेवटी एकच सांगतो, मुलं खूप संघर्ष करून डॉक्टर होतात खरं.. पण नंतर त्यांना कळतं की खरा संघर्ष तर डॉक्टर झाल्यावरच करावा लागतोय..
— समाप्त —
लेखक : डॉ. सचिन लांडगे
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा .
या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख , अडचणी , नाहीत . सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो . कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं . ” मिळतं तेच, जे आपण पेरलेलं असतं . ” आपल्याशी कोणी कसंही का वागेना, आपण सगळयांशी चांगलंच वागायचं . इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे .
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते .आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका . फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा— आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे . ” जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत . ”
जगणं कोणाचंही सोपं नसतं . आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं . ” सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. ” म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ” कृतज्ञ ” रहा .
पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही . म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे . दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून, त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तव्य कधीच सिद्ध होत नसते .
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये . कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात . कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते , ज्याचं नाव आहे , ” आत्मविश्वास ”
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.
समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा —- ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून .
या भावना नक्की आचरणात आणाव्यात असे सर्वांना सांगणे आहे .
संग्राहक – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो में लेक्चरार के पद पर कार्यरत। पूर्व में यॉर्क यूनिवर्सिटी, टोरंटो में हिन्दी कोर्स डायरेक्टर एवं भारतीय विश्वविद्यालयों में सहायक प्राध्यापक। तीन उपन्यास व चार कहानी संग्रह प्रकाशित। गुजराती, मराठी व पंजाबी में पुस्तकों का अनुवाद। प्रतिष्ठित पत्र-पत्रिकाओं में रचनाएँ निरंतर प्रकाशित। कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार 2020।
आप इस कथा का मराठी एवं अङ्ग्रेज़ी भावानुवाद निम्न लिंक्स पर क्लिक कर पढ़ सकते हैं।
अङ्ग्रेज़ी भावानुवाद 👉 Broken HeartTranslated by – Mrs. Rajni Mishra
☆ कथा कहानी – टूक-टूक कलेजा ☆ डॉ. हंसा दीप ☆
सामान का आखिरी कनस्तर ट्रक में जा चुका था। बच्चों को अपने सामान से भरे ट्रक के साथ निकलने की जल्दी थी। वे अपनी गाड़ी में बैठकर, बगैर हाथ हिलाए चले गए थे और मैं वहीं कुछ पलों तक खाली सड़क को ताकती, हाथ हिलाती खड़ी रह गयी थी। जब इस बात का अहसास हुआ तो झेंपकर इधर-उधर देखने लगी कि मेरी इस हरकत को कहीं कोई पड़ोसी देख तो नहीं रहा!
खिसियाते हुए घर में कदम रखा तो उसी खामोशी ने मुझे झिंझोड़ दिया जिसे अपने पुराने वाले घर को छोड़ते हुए मैंने अपने भीतर कैद की थी। उन पलों को महसूस करने लगी जब अपने उस लाड़ले घर को छोड़कर मैं इस नए घर में आयी थी। उसी घर को, जिसमें मैंने अपने जीवन के सबसे अच्छे बारह साल व्यतीत किए थे। माँ कहा करती थीं- “बारह साल बाद तो घूरे के दिन भी फिर जाते हैं।” न जाने किसके दिन फिरे थे, मेरे या घर के! मेरे दिन तो उस घर में बहुत अच्छे थे। शायद इसीलिए मैं नयी जगह आ गयी थी ताकि उस घर के दिन फिर जाएँ! जो भी नया परिवार उसमें रहने के लिए आए वह उसे मुझसे अधिक समझे!
यह बात और थी कि मैंने उस घर की सार-सँभाल में अपनी जान फूँक दी थी। मन से सजाया-सँवारा था। कमरों की हर दीवार पर मेरे हाथों की चित्रकारी थी। हर बल्ब और फानूस की रौशनी मेरी आँखों ने पसंद की थी। मेरी कुर्सी, मेरी मेज और मेरा पलंग, ये सब मिलकर किसी पाँच सितारा होटल का अहसास देते थे। मैंने उस आशियाने पर बहुत प्यार लुटाया था और बदले में उसने भी मुझे बहुत कुछ दिया था। वहाँ रहते हुए मैंने नाम, पैसा और शोहरत सब कुछ कमाया। इतना सब कुछ पाने के बावजूद अचानक ऐसा क्या हुआ कि मैंने उसे छोड़ने का फैसला कर लिया! शायद मेरे परिवार के खयालों की दौड़ उसे पिछड़ा मानने लगी थी। हालाँकि उसका दिल बहुत बड़ा था, इतना बड़ा कि हम सब उसमें समा जाते थे। एक-एक करके जरूरतों की सूची बड़ी होती गयी और घर की दीवारें छोटी होती गयीं। सब कुछ बहुत ‘छोटा’ लगने लगा। इतना छोटा कि उस घर के लिए मेरी असीम चाहत, मेरे अपने दिलो-दिमाग से रेत की तरह फिसलती चली गयी।
याद है मुझे, जब हम उस घर में आए थे तो मैं चहक-चहककर घर आए मेहमानों को उसकी खास बातें बताती थी- “देखो, यहाँ से सीएन टावर दिखाई देता है; और पतझड़ के मौसम की अनोखी छटा का तो कहना ही क्या! रंग-बिरंगे पत्तों से लदे, पेड़ों के झुरमुट, यहाँ से सुंदरतम दिखाई देते हैं। यहाँ का सूर्योदय किसी भी हिल स्टेशन को मात देने में सक्षम है। सिंदूरी बादलों से निकलता सूरज जब सामने, काँच की अट्टालिकाओं पर पड़कर परावर्तित होता है तो ये सारी इमारतें सोनेरी हो जाती हैं, सोने-सी जगमगातीं।”
बेचारे मेहमान! उन्हें जरूर लगता रहा होगा कि मैं किसी गाइड की तरह उन्हें अपना म्यूजियम दिखा रही हूँ। सच कहूँ तो वह छोटा-सा घर मेरे जीवन की यादों का संग्रहालय ही बन गया था। सबसे प्यारा और सबसे आरामदायक घर जिसने मेरी तमाम ऊर्जा को मेरे लेखन में जगह देने में कोताही नहीं बरती। सामने दिखाई देती झिलमिल रौशनियों के सैलाब में खोकर मैंने कई कहानियाँ लिखीं, उपन्यास लिखे। कई कक्षाएँ पढ़ायीं। कोविड में भी मुझे यहाँ से दिखाई देता, रौशनी से नहाता यह शहर कभी उदास नहीं लगा।
देखते ही देखते मैं उस घर की हर ईंट, हर तकलीफ से वाकिफ हो चुकी थी। कभी कोई चीज़ टूटकर नीचे बिखरे उसके पहले ही उस पर मेरी तेज़ नजर पड़ जाती और मैं उसकी मरम्मत करवा देती। वह भी शायद मेरी थकान समझ लेता था। उस समय कहीं से गंदा नजर न आता और मैं संतोष की साँस लेकर अच्छे से आराम कर लेती। हम एक दूसरे से इस कदर परिचित थे! फिर भी, मैं उसे छोड़कर यहाँ नए, बड़े घर में आ गयी थी। सवेरे उठकर दुनिया देखने का मेरा वह जज़्बा इस नए मकान में कहीं दबकर रह गया था। यह है बहुत बड़ा, लेकिन जमीन पर, उस छोटे मकान की तरह सीना ताने ऊँचाई पर नहीं खड़ा है। छोटे लेकिन बड़े दिल वाले लोग मुझे हमेशा अच्छे लगे हैं। यही तो उस घर की खास बात थी, उसका दिल।
हर सुबह उस उगते सूरज की लालिमा को निहारते हुए, मुट्ठी में जकड़कर अपने भीतर तक कैद किया है मैंने। उसकी नस-नस को जब मैं शब्दों में चित्रित करती तो घर वाले कहते- “तुम ईंटों से प्यार करती हो जो बेजान हैं। फर्श से बात करती हो जो खामोश है।” लेकिन सच कहूँ तो मैंने उन सबको सुना है। घर का ज़र्रा-ज़र्रा मेरे हाथों का स्पर्श पहचानता था। जब-जब झाड़-पोंछकर साफ करती, तब-तब ऐसा लगता था जैसे वह घर हँसकर, बोलने लगा है।
उसी घर को छोड़ते हुए, अपने सामान को ठीक से ट्रक पर चढ़ाने की चिंता में मैं इतनी व्यस्त थी कि ठीक से अलविदा भी नहीं कह पाई थी। अपने उसी घर की चाबी किसी और को पकड़ाते हुए मेरा मन जरा भी नहीं पसीजा था बल्कि स्वयं को बहुत हल्का महसूस किया था मैंने, मानो किसी कैद से मुक्ति मिल गयी हो। उस घर से चुप्पी साधे निकल गयी थी मैं। घर उदास था, मुझे जाते हुए देख रहा था। इस उम्मीद में कि मैं उसे छोड़ते हुए आँखों को गीला होने से रोक नहीं पाऊँगी, पर उस समय मुझे ताला बंद करने, पेपर वर्क करने और ऐसी ही कई सारी चिंताओं ने घेर रखा था। मैं अपनी नयी मंजिल की ओर बढ़ते हुए, उस आपाधापी में सब कुछ भूल गयी थी। मेरी सारी भावनाएँ इन दीवारों में समा गयी थीं। मुझे इस तरह जाता देख उन पर उदासी छा गयी थी। घर का हर कोना मेरा ध्यान खींचने की पुरजोर कोशिश कर रहा था जिसे मैंने कभी फूलों से, कभी फॉल के रंग-बिरंगे शो पीस से सजाया था। बाहर कदम रखते ही मेरे हाथ में सीमेंट की एक परत गिरकर आ गयी थी। मैं उस आलिंगन को समझ नहीं पाई थी और यह सोचा कि “अच्छा ही हुआ यहाँ से निकल लिए, इस घर के अस्थिपंजर ढीले हो रहे हैं। पुरानी तकनीक, आउट डेटेड।” मैंने उस परत को कचरे के डिब्बे में फेंक दिया और तेजी से ट्रक के साथ निकल गयी थी।
आज जब बच्चों की तटस्थ आँखें, मेरी आँखों की गीली तहों से कुछ कहे बगैर ओझल हो गयीं तो मुझे लग रहा है कि मेरा अपना शरीर सीमेंट जैसा मजबूत और ईंटों जैसा पक्का हो गया है। भट्टी की आँच में पकी वे ईंटें जो सारा बोझ अपने कंधों पर लेकर भी ताउम्र खामोश रहती हैं। मेरा हर अंग उस खामोशी में जकड़-सा गया है। दिनभर चहकते, मेरे अगल-बगल मंडराते बच्चे, जरूरत पड़ने पर मुझमें पिता को पा लेते और माँ तो हर साँस के स्पंदन में उनके साथ ही होती। आज बच्चों का यह रूप अपने उन नन्हे बच्चों से अलग था जब वे स्कूल जाते हुए ममा को छोड़ने की तकलीफ अपनी आँखों से जता देते थे। बार-बार मुड़कर हाथ हिलाते रहते थे। मेरी हर मनोदशा को मुझसे पहले पहचान लेते थे। कुछ पढ़ने बैठती और चश्मा न मिलता तो तुरंत मेरे हाथ में लाकर थमा देते। आज उन्हीं दोनों बच्चों ने अपने अलग घरों में जाते हुए ममा को पलट कर देखा तक नहीं था।
मैंने बच्चों की सुविधा के लिए उस घर को छोड़ा था। अब बच्चों ने अपनी सुविधा के लिए मुझे छोड़ दिया। अचानक इतना ‘बड़ा’ घर भी ‘छोटा’ पड़ने लगा या फिर शायद मैं ही छोटी हो गयी थी और बच्चों का कद बड़ा हो चला था। घर की अतिरिक्त चाबियाँ मुझे थमाकर बच्चों ने जैसे मुक्ति पा ली थी। पुरानेपन और छोटेपन से मुक्ति का अहसास! शायद मुझे छोड़ते हुए उन्हें भी उतनी ही जल्दी रही होगी। मेरा अस्तित्व उनके लिए उस मकान की तरह ही फौलादी था, भाव प्रूफ। उन्हें मेरे अस्थिपंजर ढीले होते दिख गए होंगे।
सूखे आँसुओं की चुभन से परे मेरा शरीर मुझे पहले से कहीं अधिक मजबूत लगा। पक्की दीवारों से बना हुआ, मुझे किसी भी भावुकता के मौसम से मुक्त रखता हुआ। सीमेंट और कंक्रीट इस या उस मकान में नहीं, मेरे हाड़-माँस के भीतर कहीं गहरे तक समा गये हैं। अपने बच्चों के लिए मैं भी एक मकान से ज्यादा कुछ नहीं हूँ। ये खामोश दीवारें चीख-चीखकर मेरे अपने ही शब्द दोहरा रही हैं, “पुरानी तकनीक, आउट डेटेड।” मैंने भी इस सच को स्वीकार कर लिया है कि नयी तकनीक में घर बोलते हैं, इंसान नहीं।
कान जरूर कुछ सुन रहे हैं, शायद नया घर ठहाके लगा रहा है या फिर इसमें पुराने घर की आवाज का अट्टहास शामिल है। बरस-दर-बरस, ममतामयी पलस्तर की परतों से ढँका मेरा कलेजा टूक-टूक हो गया था, जड़वत।
(श्री सुरेश पटवा जी भारतीय स्टेट बैंक से सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों स्त्री-पुरुष “, गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की (नर्मदा घाटी का इतिहास) एवं तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश।आज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “आंखों में जन्नत के ख़्वाब जवाँ रहते हैं…”।)
ग़ज़ल # 52 – “आंखों में जन्नत के ख़्वाब जवाँ रहते हैं…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’