(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनका एक स्मृति चित्र “वैभव जोशी….. एक वैभवशाली गझलकार”. अक्सर हमारे जीवन में कुछ लोग मिलते हैं और अपने सहज सौम्य व्यक्तित्व की एक अमिट छाप छोड़ देते हैं। साहित्यिक विभूतियों का जीवन भी कुछ भिन्न नहीं है। ऐसे ही प्रभावशाली व्यक्तित्व के धनी हैं श्री वैभव जोशी जी। मैं आभारी हूँ , सुश्री प्रभा जी का जो उन्होंने मेरे आग्रह को स्वीकारा और सुप्रसिद्ध मराठी कवि / ग़ज़लकार / गीतकार श्री वैभव जोशी जी के सन्दर्भ में अपने आत्मीय विचार उतने ही सहज भाव से हमें हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करने का अवसर दिया।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 36 ☆
☆ वैभव जोशी….. एक वैभवशाली गझलकार ☆
कवी / गझलकार / गीतकार म्हणून आज वैभव जोशी सर्वदूर परिचित आहेत.
माझ्या मते वैभव सध्या सर्वाधिक लोकप्रिय कवी आहे! मी वैभव जोशींना सर्व प्रथम वाईच्या “गजल सागर” च्या संमेलनात सर्वप्रथम ऐकलं, त्यांची गझल आणि सादरीकरण अप्रतिम होतं!
त्या वर्षी मी “काव्य शिल्प” या कवींच्या संस्थेची अध्यक्ष होते, एका कार्यक्रमात मी वैभव जोशी ना पाहुणा म्हणून बोलंवलं! कारण गजलसागरच्या नियतकालिकांमध्ये वैभवच्या गझला वाचल्या होत्या, तीच आमची ओळख एकमेकांशी!
त्यानंतर नागपूर च्या अ.भा.साहित्य संमेलना निमित्ताने नागपूर येथे भेट झाली मी निमंत्रित कविसंमेलनात होते तर वैभव गझलसंमेलनात!
वैभव च्या वाढदिवसानिमित्त उद्यानप्रसाद कार्यालयात आयोजित केलेल्या चंद्रशेखर सानेकरांबरोबरच्या कार्यक्रमाला मी गेले होते नंतर भरत नाट्यमंदिरात झालेल्या सौमित्र बरोबर च्या कार्यक्रमानंतर वैभव चे अनेक कार्यक्रम पाहिले, टीव्ही, सिनेमात वैभव ची गीतं ऐकली, फेसबुक वर अनेक कविता, गझला ऐकल्या!
दोन वर्षांपूर्वी माझा सत्तावन्न वर्षाचा मामेभाऊ गेला, ती भावना व्यक्त करणारी पोस्ट मी फेसबुक वर टाकली तेव्हा वैभवची कमेन्ट होती, “ताई…क्लेश होणारच, कधीही एकाकीपण वाटलं तर मला हाक मारा . मी आहे”.
वैभव मला नेहमीच धाकट्या भावासारखाच वाटतो, मी गेली अनेक वर्षे काव्यक्षेत्रातील वैभवची दैदिप्यमान कारकीर्द पहाते आहे. कवी म्हणून आणि माणूस म्हणूनही वैभव आवडतोच, हसतमुख, प्रेमळ, वडिलधा-यांचा आदर ठेवणारा! एक कवयित्री मध्यंतरी खुप भारावून सांगत होती, “अगं वैभव जोशी नी मला अगदी वाकून नमस्कार केला”!
मी म्हटलं “तो सगळ्या म्हाता-या कवयित्रींना तसा नमस्कार करतो, मलाही!”
एकूण वैभव च्या डोक्यात हवा गेलेली नाही, त्याच्या अनेक गझला, कविता, गीतं आवडतात…..पूर्वी मला तो क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत सारखा वाटायचा…आता कधीतरी त्याच्यात यशवंत दत्त चा भास होतो, असो. तरीही वैभव वैभव आहे एकमेव! अनेकांचा लाडका कवी! स्वतःचं वेगळेपण जपणारा! वैभव ची “वगैरे” गझल खुप गाजलेली!
शेवटी माझा आवडता वैभव जोशी चा शेर—
बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला,
रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला
अनेक शुभेच्छांसह,
-प्रभा सोनवणे
सुंदर
धन्यवाद भावनाजी