श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत भावप्रवण कविता “महिमा काळाचा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 47 ☆
☆ महिमा काळाचा ☆
देह आहे कापराचा
म्हणे मालक जागेचा
जागा जागेवर आहे
धूर होतोय देहाचा
डाव हाती तुझ्या नाही
वागणे हे राजेशाही
डाव श्वासाने जिंकला
दिला झटका जोराचा
नको ऐश्वर्याचे सांगू
आणि मस्तीमध्ये वागू
येता वादळ क्षणाचे
होई पाला जीवनाचा
नाही कडी नाही टाळा
खग उडून जाईल
नाही भरोसा क्षणाचा
तुझे आसन ढळले
नाही तुलाही कळले
स्थान अढळ नसते
सारा महिमा काळाचा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८