सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में एक भावप्रवण कविता “आयुष्य कधीचे थांबले ……..“। जब सब कुछ सकारात्मक लगे और हृदय में कोई उमंग जागृत न हो तब ऐसी कविता जन्मती है क्योंकि हमें बेशक लगे किन्तु, जीवन कभी भी थमता नहीं है। एक अप्रतिम रचना । सुश्री प्रभा जी द्वारा रचित संवेदनशील रचना के लिए उनकी लेखनी को सादर नमन ।
मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 53 ☆
☆ आयुष्य कधीचे थांबले ……..☆
हे पात्र नदीचे संथ, अवखळ नाही
जगण्यात अता कुठलेच वादळ नाही
आयुष्य कधीचे थांबले काठाशी
हृदयात अताशा होत खळबळ नाही
तू ठेव तिथे लपवून ती गा-हाणी
सरकार म्हणे आम्हास कळकळ नाही
बाईस विचारा, काय खुपते आहे
गावात तिच्या मुक्तीचि चळवळ नाही
की मूग गिळावे आणि मूकच व्हावे ?
‘त्यांच्या’ इतकी मी मुळिच सोज्वळ नाही
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]