सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में एक समसामयिक विषय पर आधारित अतिसुन्दर नवीन रचना पूर्वज। पितृ पक्ष में अपने पूर्वजों का स्मरण करने की अपनी अपनी परंपरा एवं अपना अपना तरीका है। सुश्री प्रभा जी ने इस काव्याभिव्यक्ति के माध्यम से अपने पूर्वजों का स्मरण किया है। जो निश्चित ही अभूतपूर्व है। मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 63 ☆
☆ पूर्वज ☆
पूर्वज माझे लढवय्यै अन पराक्रमी ही
तलवारींची खूण सांगते त्यांची कहाणी
इतिहासाच्या पानावरती खरेच शोधा
रक्ताच्या अक्षरात लिहिली त्यांची गाथा
“मर्द मावळ्या रक्ताची मी” म्हणणारी ती
पूर्वज माझी आत्या आजी खापरपणजी
घराण्यातले होते कोणी माझ्या समही
नर्मदा कुणी वडिलांचीही आत्या होती
जुने पुराणे किस्से सांगत माणिक मामा ,
“तुझा चेहरा अगदी आहे नमुआक्काचा”
भागिरथी काकींची स्वारी घोड्यावरती
ऐटबाज अन ताठ कण्याच्या सा-या दिसती
आठवते मज माझी आजी आई काकी
स्वर्गस्थ त्याही पहात असती धरणीवरती
किती पिढ्यांशी नाळ जोडली जाते आहे?
पूर्वज सारे या काळी मी स्मरते आहे
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
धन्यवाद हेमंतजी, सुंदर प्रस्तावना ?