☆ कवितेचा उत्सव ☆ आस ☆ कवी आनंदहरी ☆
तुझी लागलीसे आस
तुझ्याठायीं नाही वास
मन होई रे उदास
पांडुरंगा !!
जन्म वृथा जाई वाया
नाही भौतिकाची माया
तुजपायी झिजो काया
पांडुरंगा !!
ध्यानी मनी तुझे भास
जीवा राहो तुझा ध्यास
तुजमुळे श्वासोश्वास
पांडुरंगा !!
आता उराउरी भेटी
तुझी नाही जगजेठी
ऱ्हावे तुझे नाम ओठी
पांडुरंगा !!
© कवी आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈