श्री मुबारक बाबू उमराणी
शिक्षा – एम.ए.बी एड्.बी.लिब .
लेखन – कविता लेखन, कथाव इतर.-दिवाळी अंक, प्रातिनिधिक संग्रह.
पुरस्कार/अलंकरण – (1) निसर्ग मित्र शिक्षक पुरस्कार-०१० (2) रविकिरण सेवाश्री पुरस्कार–२०११ (3) युवाशक्ति सामाजिक संस्था नाशिक. आदर्श शिक्षक पुरस्कार-२०११ (4) सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल, आदर्श शिक्षक पुरस्कार-२०११ (5) महाराष्ट हरितसेना सदस्य-२०१७ (6) समीक्षक. म्हणून. म.रा मा.उच्च.मा. शिक्षण मंडळ,पुणे,५. इ.१०वी साठी (7) ग्रीन ओलम्पियाड परीक्षा उत्तम नियोजक म्हणून सन्मानित (नवी दिल्ली)-२०१७ (8) स्वाध्याय पुस्तक लेखन इ.१०वी.पुणे बोर्ड (9) राज्यस्तरिय ,जिल्हास्तरिय तज्ज्ञ मार्गदर्शक मराठी विषय (10) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली,वेस्ट कल्चरल झोन आयोजित सांगली निर्मितीक्षम नाट्य प्रशिक्षण (11) नेपथ्य आणि प्रकाश योजना, कार्यशाळा उपस्थित, अखिल भारतीय नाट्यशास्त्र विद्यामंदिर समिती, सांगली-२००६ (12) समाजरत्न साहित्य पुरस्कार-२०१८ सम्राट फौडेशन, सांगली (13) उत्कृष्ट काव्य लेखन,रंगीत काव्यधारा साहित्य मंच, वासिम-२०१८ (14) साहित्यसेवा साहित्य समुहातर्फे लीनाक्षरी पुरस्कार व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, माहूरगड, नांदेड-२०१९ (15) कविभूषण पुरस्कार, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव २०१९, नांदेड (16) अनेक काव्य स्पर्धेत परीक्षक (17) अर्धांगी कविता संग्रहासाठी प्रस्तावना लेखन (18)काव्यस्पंदन संस्थेचा महाराष्ट्र भूषण,नवरत्न पुरस्कार पुणे
☆ कवितेचा उत्सव ☆ बाल कामगार! ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆
भूक अंगार होऊन रोज पेटे
उभं आयु काजळी धुराडी वाटे
कळ सोसेना भुकेची आग घरा
बाप व्यसनी पडला पहा धरा
आई धुणे भांडी दिसभर करी
ओढे संसार गाडा ती आसूभरी
जन्मे यातुनच बालकामगार
हातभारासाठी काय करणार ?
दुर्दैवच जगी भयान अंधार
दूर दूर जाई शिक्षण भांडार
कमी पगारात राबवी मालक
मोडू प्रथा चला जागवू पालक
© श्री मुबारक बाबू उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अभिनंदन