श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
☆ जीवनरंग : लघुकथा – जमाना ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆
शेजारच्या घरून कशाचा तरी आवाज आला. सर्वांनी ऐकला. एक -दुसर्याकडे साशंक नजरेनी पाहीलं. परंतु पुढच्याच क्षणी सगळे आपापल्या कामांत गुंतले. फक्त एक दादू सोडून. दादू बेचैन होऊन गेले. शेवटी आपल्या जागेवरून उठले आणि बाहेर गेट कडे जायला निघाले तर मुलगा अनुलोम विचारू लागला, ‘‘बाबा, कुठे निघालात?’’
दादूंनी आवाजाच्या देशेने आपले बोट दाखविले.
‘‘तिकड़े काही नाही आहे …. तुम्ही बसा आपल्या जागी.’’
थोड्या वेळानी पुन: शेजारुन आवाज! वाटलं जसं कोणी आलमारी तोडत आहे ! दादू पुन्हा हबकले. इकडे-तिकडे बघायला लागले. सर्व आपाल्या कामात मशगूल. आवाजं येत राहीला. कधी भांडे पडण्याचा, तर कधी तोड़-फोड़ होत असल्याचा. दादू बेचैन होत राहीले.
दुसर्या दिवशी सकाळी शेजारी परत आले तर त्यांना घराचे कुलुप तुटलेले दिसले. आंत प्रवेश केल्यावर घरांत चोरी झाल्याचे ध्यानांत आले. पोलीस आलेत. शेजार म्हणून अनुलोम कडे ही विचारपुस व्हायला लागली.
‘‘तुम्ही लोकं काही सांगू शकता काय?’’
‘‘नाही सर, आम्हाला ही आजच कळले. वाटतय कोणीतरी चोर असावा…’’
‘‘तुम्ही काही आवाज वगैरे ऐकला किवा संशय येईल असे कोणी…?’’
‘‘जी, आम्ही कांहीच सांगू शकत नाही. आम्ही सर्व उशिरापर्यंत टी. वी. बघत होतो. कोणीच काही आवाज वगैरे ऐकला नाही…’’
अनुलोम उत्तरं देत होता. हॉल मधे एकीकडे बसलेले दादू वारंवार खुर्चीवरून उठू पाहत होते.
पोलीस परतले. अनुलोम हातात एक गोळी आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन दादू जवळ आला. गोळी दादू च्या हाथावर ठेवत म्हणाला, ‘‘फक्त गोळ्या खात राहिल्यानी बी. पी. कमी होणार नाही आहे. तुम्ही आपली ही सवय सोडा. आता जमाना पूर्वीसारखा राहीला नाही.’’
© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mail: [email protected] * web-site: http://sites.google.com/view/bhagwan-vaidya
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
ज़माना , चांगली लघुकथा.