सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में एक समसामयिक विषय पर आधारित विचारणीय कविता कोरोना। सुश्री प्रभा जी ने इस कविता के माध्यम से वैश्विक महामारी पर गंभीर विमर्श किया है। आज इस वाइरस के कारण मानवजाति के अस्तित्व पर प्रश्नचिन्ह लग गया है। मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे। आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 65 ☆
☆ कोरोना ☆
प्रथम पाहिली बातमी,
चीनमध्ये पसरलेल्या,
या भयानक विषाणू संसर्गाची,
वटवाघूळाच्या भक्षणाने,
झालेल्या आजाराची!
अनेक अफवा, तर्कवितर्क,
हा विषाणू पक्षाप्राण्यातून आलाय
की प्रयोगशाळेत तयार केलाय,
मानवाने मानुष्यजातीच्या
विनाशासाठी…….??
जगभर पसरलेली ही लागण,
सगळेच व्यवहार ठप्प!
जग थांबले आहे जणू
स्टॅच्यूच्या खेळासारखे!!
मी घरात बंद गेले सहा महिने,
विश्वशांती,विश्वाचे आरोग्य,
सांभाळणारा विधाताही
बंद देवळात…..
आणि आम्ही करतोय प्रार्थना…
ए मालिक तेरे बंदे हम…..
आम्ही करतोय कविता,
घेतोय वाफ नाकातोंडात
व्हाटस् एप्प वर वाचतोय
सुरक्षित रहाण्याचे उपाय….
मोबाईल वर वाजतेय धून
बाहेर न पडण्याविषयी…..
आणि मैत्रीण करतेय आग्रह…
गाठीभेटीचा….
पण गावात …शहरात…गल्लीत…
पसरलेला हा कोरोना–कोविड–
नाही मुभा देत कुणाच्याच घरी
जाण्याची अथवा कुणाला
घरी बोलवण्याचीही….
या उमाळ्याच्या गाठीभेटींपेक्षा
आवश्यकता आहे अस्तित्व
टिकविण्याची, स्वतःचं आणि इतरांचंही…..
घरात राहूनच जिंकायचे आहे युद्ध
ज्याचं त्यालाच….
सांगून टाकते निर्वाणीचं….
व्हाटस् एप्प च्याच भाषेत…
“घरी हूँ मैं बरी हूँ मै”
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
धन्यवाद हेमंतजी
घरी हूं मैं बरी हूं मैं….चांगली कविता
धन्यवाद वसुधा जी