सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग : पहिला डाव घटस्फोटाचा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
“हाय! कशी आहेस? ”
“मस्त! तू कसा आहेस? ”
“मजेत. एकटीच? ”
“नवरा दिल्लीला गेलाय. ”
“नेहमी ट्रॅव्हल करावं लागतं त्याला? ”
“आताचे जॉब्स असेच असतात ना! तुझी बायको? ”
“पुण्याला. पुण्याला शिफ्ट झालो आम्ही. माझा नवा जॉब पूना-बेस्ड आहे. ”
“या जॉबमध्येही ट्रॅव्हलिंग…. ”
“महिन्यातून एक -दोन दिवस. पूर्वीसारखं वीस-बावीस दिवस नाही. ”
“अच्छा! म्हणजे आत्ता जमलं तुला जॉब चेंज करायला? ”
“कूल! आपण घरी नाही आहोत एवढा आवाज चढवायला. आणि आता नवरा-बायकोपण नाही आहोत. ”
“सॉरी!”
“…….”
“यू मे स्मोक. आय वोन्ट माइन्ड. ”
“मी सोडलंय स्मोकिंग. ”
“काsssय?”
“हे लग्न, त्याला चांगलं आरखून-पारखून केलं असशील ना? स्मोकिंग न करणारा वगैरे.”
“……”
“दॅट मिन्स ही स्मोक्स? ”
“इट्स ओके. अदरवाईज ही इज अ गुड गाय.”
“म्हणजे मी…. ”
“तसा तूही चांगला होतास. दोष असलाच तर सिस्टीमचा होता.”
“सिस्टीमचा? ”
“हो. आपण एकमेकांकडे कधी स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलंच नाही. माझ्यासाठी तू फक्त माझा नवरा होतास. त्यामुळे तुला मी सतत त्या चौकटीत कोंबायचा आटापिटा करायचे. तुझी फिरतीची नोकरी, स्मोकिंग वगैरे गोष्टी त्या मॅट्रिक्समध्ये सामावणाऱ्या नव्हत्या.”
“मग आता? ”
“आता नात्याचं मॅट्रिक्स बाजूला ठेवून मी त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघते. त्यामुळे तेवढा त्रास नाही होत त्याच्या वागण्याचा. सगळे गुंते सुटून जगणं सोपं झालंय त्यामुळे.”
“यू सेड इट.”
“तू कसा काय बदललास एवढा?”
“अरुणा खूप समंजस आहे. मी जसा आहे, तसा तिने मला एक्सेप्ट केलाय – माझ्या दोषांसकट. आय एम सॉरी टू से ;पण कोणी आपल्याला डिवचत राहिलं, तर आपलाही अहंकार फणा काढतो.तिने कधीच डिवचलं नाही मला. मग मीही माझ्या बाजूने समजूतदारपणा दाखवायचा प्रयत्न केला. दॅट्स ऑल.”
“एकंदरीत आपण दोघेही आता शहाणे झालो आहोत, असं म्हणायला हरकत नाही.”
“यू सेड इट!”
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
फोन नं. 9820206306.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈