श्रीमती माया सुरेश महाजन
☆ जीवनरंग ☆ मुलगा-मुलगी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन ☆
रेल्वेत आमच्या समोर सीटवर एक मध्यमवयीन जोडपे त्यांच्या तीन मुली व एक मुलगा असे बसलेले होते. ती भावंड कधी खाण्याच्या वस्तुवरून, नाही तर एखाद्या खेळण्यावरून आपसात भांडत होती. मुलगा सर्वात मोठा म्हणजे बारा-तेरा वर्षांचा असेल त्यानंतरच्या तिघी मुली दोन-तीन वर्षांच्या अंतराने दिसत होत्या. भावाच्या पाठची मोठी मुलगी दहा वर्षाची वाटत होती. सुंदर, निरोगी, कानात बहुतेक नुकतेच टोचून घेऊन डूल घातलेले होते, कारण कानांच्या पाळीवर तेल हळद लावलेले दिसत होते. खेळता-खेळता मुलांच्यात परत भांडण झाले आणि मुलाने बहिणीच्या कानावरच जोरात थप्पड मारली. मुलगी किंचाळली. तिच्या कानाच्या पाळीवरून रक्ताचे थेंब ओघळले. आईने जरा रागानेच मुलाकडे पाहिले. पण तोपर्यंत मुलीने भावाच्या मनगटाचा चावा घेतला, दात उमटले अगदी.
तो पण किंचाळला मनगटावर व्रण पाहून आईने लेकीलाच जोरात चापट मारली,
‘‘का गं? लाज नाही वाटत? भावाला इतक्या जोराने चावलीस? तो काय शत्रू आहे का तुझा?’’
‘‘त्याने का इतक्या जोराने मारले मला?’’
‘‘त्याच्या मारण्याने काय मरत होतीस का लगेच? येऊन-जाऊन एकुलता एक मुलगा आहे, त्याच्याच मागे अगदी हात धुऊन लागता तुम्ही सगळ्या,’’ आई अजूनही रागाने बडबडत होती.
‘‘मी चावल्यानेदेखील तो काय मरणार होता?’’
मूळ हिंदी कथा – लड़का-लड़की – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा
मो.- ९३२५२६१०७९
अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन
मो.-९८५०५६६४४२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈