श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ गांधींना येऊ दे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
`वर्मा सर, आपण या कार्यालयात सगळ्यात ईमानदार ऑफीसर म्हणून सुप्रसिद्ध आहात. म्हणूनच आपण आपल्या केबीनमध्ये गांधिजींच्या दोन तसबिरी लावल्या आहेत का? एक मागे आणि एक पुढे? वर्मांच्या हाताखाली काम करणारे शर्मा आपल्या वरिष्ठांना विचारत होते.
`ते अशासाठी शर्मा, माझ्यासमोर बसलेल्या अपरिचिताने माझ्यामागे लावलेला गांधीजींचा फोटो बघून खोटे बलू नये आणि मी जेव्हा खोटे बोलेन, तेव्हा निश्चिंत असेन, की मला खोटं बोलताना गांधीजी बघत नाही आहेत. ‘आता काय सांगायचं, दहात आठ वेळा तरी मला खोटं बोलावं लागतं’ वर्मांच्या मनात आलं, पण ते बोलले नाहीत.
`पण सर, गांधीजींचा फोटो तर आपल्या पुढेही लावलेला आहे. त्याचं काय?’
`त्याचं काय आहे, मी. शर्मा, तुम्ही बघितलं असेल, की मी शिपायाला वारंवार बोलावून फोटो स्वच्छ पुसून आणायला सांगतो.’
`होय! बर्याचवेळा… म्हणूनच आपल्या समोरील फोटावर कधी धूळ दिसत नाही. पण मागचा फोटो मात्र धुळीनं भरलेला आहे.’
`त्याचं असं आहे शर्मा, जेव्हा मला खोटं बोलण्याची वेळ येते, तेव्हा, त्यापूर्वी मी शिपायाला बोलवून फोटो स्वच्छ पुसून आणायला सांगतो. शिपाई तसंही कुठलंही काम दोन तासांच्या आधी करतच नाही. भिंतीवरून फोटो हटवला जाताच, मी दोन-तीन फ्रॉड ठेके निपटून टाकतो.
‘वा:! काय बोललात! आता यावर चहा झालाच पाहिजे.’
`जरा थांबा. गांधीजी येऊ देत. तसंही कुठल्याही सरकारी कार्यालयात चहा पिण्याइतकं खरं काम दुसरं कोणतं होत असेल?’ आणि दोघेही हास्य-विनोदात बुडून गेले.
मूळ हिंदी कथा – गांधी को आने दो मूळ लेखिका- मृदुला श्रीवास्तव
भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈