☆ कवितेचा उत्सव ☆ ही अशी माणसं ☆ श्री प्रकाश लावंड ☆
इथं माझी माणसं
तिथं तुझी माणसं
थुंकी झेलण्या तत्पर
सारी खुजी माणसं
ही कुलंगी माणसं
ही लफंगी माणसं
पार्टी बदलणारी
ही दुरंगी माणसं
ही बेसुरी माणसं
ही बकासुरी माणसं
दानवांना लाजविती
ही असुरी माणसं
ही पलटती माणसं
ही उलटती माणसं
खोटं हसून खरं
ही दडपती माणसं
चिणून टाकावीत
ही खिदळती माणसं
कोंडून घालावीत
ही उधळती माणसं
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.
मोबा 9021497977
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
तर्हेतर्हेची माणसं.खूप छान वर्णन केले आहे.