☆ जीवनरंग ☆ खारीचा वाटा ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆
अनघा , तिच्या सासूबाई आणि सासरेतिघं चहा-ब्रेकफास्ट घेत होते, तेवढ्यात नवरा आणि मुलगा पण आले. लॉक डाउन मूळे हे एक बरे झाले होतेकी सगळेएकत्र जमून चहा-ब्रेकफास्ट घेत होते.” अनघा , आज सकाळी लवकर उठून तु भराभर सगळे आवरलेस, एकदम खुश दिसते आहेस ! ” इति सासरे. हो बाबा आज पासून माझी शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे तेव्हा मला बरेच दिवसाने विद्यार्थ्यांचे यस मॅम, थेंक्यु मॅम, सॉरी मॅम असे शब्द कानावर पडणार आहे.” अनधा उत्तरली.
“पण अनु तुला ते ऑनलाईन वगैरे जमणार आहे का?” नवरा गुरगुरला.
“हो न जमायला काय झालं मी एक होउ घातलेल्या आइ-टी इंजिनियर ची आई आहे. अमेय ने मला सगळे निट समजावले आहे.”
“ऑनलाईन शिक्षण म्हणे …! नसते टाईम पास उद्योग … !” नवरा पुटपुटला.
“नाही हो बाबा मी तर म्हणेन जसे सध्याचा काळात आपण डॉक्टर, नर्स, पोलिस ह्याचे कौतुक करतो तसे शिक्षकांचे पण करायला हवे ते सगळे सुद्धा नुसते अभ्यास घेण्याचे काम नाही करत, ते आपल्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या निगेटीव्ह वातावरणातून पॉझिटीव्ह एक्टिवीटत बिझी ठेवतात. मला तर अभिमान वाटतो माझ्या आईचा त्यात खारीचा वाटा आहे.” लेकाने केलेले कौतुक एकून अनधा सुखावली. “अनघा तु तुझे कामाचे बघ,मी पोळ्या करेन.” सासूबाई म्हणाल्या.
“हो मी पण भाजी निवडून देतो तेवढाच आमचा सुद्धाखारीच्या घरच्यां चा वाटा….” सासरे हसत म्हणाले.
© सौ. स्मिता माहुलीकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खारीचा वाटा,खूपच मोठा.
सध्याच्या परिस्थितीचे नेमके वर्णन.
खरय.बदलत्या परिस्थितीशी जुळवुन घेता अााले पाहीजे. छोटीशीच गोष्ट पण खुप कांही सांगुन जााणारी.