श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
आई तुळजाभवानी मातेच्या विविध रुपात बांधण्यात येणाऱ्या पूजेच्या वर्णनात आजच्या चारोळ्या गुंफल्या आहेत
– साधक उर्मिला इंगळे
☆ केल्याने होतं आहे रे ☆
श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -4
वध दैत्यांचा करुनी
माता तुळजाभवानी
देवतांची करे मुक्ती
कृष्णकांती ही कल्याणी!!
केली मुरली अर्पण
भयभीत सर्व देव
भवानीच्या मुरलीने
स्वर्गप्राप्ती अनुभव!!
मुरलीची महापूजा
आवर्जून बांधतात
अलंकार महापूजा
नवरात्री उत्सवात !!
छत्रपती शिवाजींना
तलवार भेट दिली
धर्म रक्षणाच्या साठी
माय भवानी धावली!!
विष्णूदेव विसावले
शेषशैय्येच्या वरती
घेत होती अंबामाता
नेत्र कमळी विश्रांती!!
विष्णूदेवांची ती शैय्या
अंबा मातेला अर्पण
शेषशायी अलंकारे
तिचे होतसे पूजन !!
अष्टादश भुजा देवी
दैत्य महिष मारीला
सर्व देवतांचे तेज
पराक्रम घडविला !!
महालक्ष्मी शोभे रुप
वध महिषा सुराचा
घेतलासे अवतार
आदिशक्ती या रुपाचा !!
छत्रपती शिवरायाला
आशीर्वाद द्यावयाला
आली तुळजाभवानी
किल्ले प्रतापगडाला !!
क्रमश: …..
©️®️ साधक- उर्मिला इंगळे
सातारा
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈