☆ विविधा ☆ श्रीमंती….मनाची ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
काल मी व माझी मैत्रीण छाया बाजारात जायला निघालो . समोरच बस उभी होती. म्हंटल चला आज बसने जाऊ .बस मधे चढ़णे उतरणे म्हणजे या वयात तसं सोपं नसतं. पण मधुन मधुन मला हे अस करायला आवडत .आपला confidence पण वाढतो. व पैसेही वाचतात ना. आपली पीढी पैसे वाचवायचा एकही Chance सोडत नाही. वीस मिनिटे चालून ,वीस रुपये वाचविणे, छान जमते आपल्याला .व काही तरी विशेष केल्याचे समाधान ही मिळते . नवीन पीढीला हे पटण्यासारखे नाही. व आवडत तर त्याहूनही नाही. असो, यालाच जनरेशन गॅप म्हणतात .••••
मी व छाया बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .आमच्याच बरोबर चढलेली एक बाई सहज तेथे बसू शकत होती .पण तिने ती सीट मला दिली. पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा तिने आपली सीट दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला. ही बाई अगदी सामान्य ,म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावी ,असा अंदाज एकंदर तिला बघून येत होता.•••
बस मधे चढताना ही बाई माझ्या बरोबर मागे होती . तिला बघून मी आपली पर्स सांभाळतच बस मधे चढले होते .आता शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो. तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्या बाईंशी बोलले. त्यांना विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्या ला का देत होता ?? तेंव्हा तिने दिलेले उत्तर हे असे •••••
ती म्हणाली, काकू मी शिकलेली पढलेली नाही हो. अशिक्षित आहे मी .एके ठिकाणी काम करते .व माझ्या परिवाराला थोडा बहुत हातभार लावते. माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही. ज्ञान नाही, पैसा नाही. तेंव्हा मी हे अस रोजच करते. हेच मी सहज करू शकते. दिवसभर काम केल्यानंतर अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमत. काकू तुमचे पाय दुखत असावेत. हे माझ्या लक्षात आले होते. म्हणून मी तुम्हाला माझी जागा दिली. तुम्ही मला धन्यवाद म्हणाला ना त्यात मला खूप समाधान मिळाले. मी कोणाच्या तरी कामी आले ना त्याचे .••••••••
असं मी रोज करते ••••.माझा नियमच आहे तो .•••• आणि रोज मी आनंदाने घरी जाते.•••
तिचे उत्तर ऐकून मी थक्कच झाले. तिचे विचार. तिची समज बघून या बाईला अशिक्षित म्हणायचे का ? काय समजायचे ??
कोणाकरिता काही तरी करायची तिची इच्छा, ••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना .••• मी कशा रीतीने मदत करू शकते??? त्यावर शोधलेला तिचा उपाय बघून, मला तिच्या पासून पर्स सांभाळायचा माझा प्रयत्न आठवला .व मला माझीच लाज वाटली .•••••
देव सुध्दा आपल्या या व निर्मीती वर खुष असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती . असं दिमाखात सांगत असेल .••••••
आज या बाईने मला खूप गोष्टी शिकवल्या. स्वतः ला हुषार, शिक्षित समजणारी मी तिच्या समोर खाली मान घालून स्वतः चे परिक्षण करू लागले.••••
किती सहज तिने तिच्या समाधानाची व्याख्या सांगितली.•• देव हिला नक्कीच पावला असणार..••मदत ही खूप महाग गोष्ट आहे कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .••••••••
सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यांवर गॉगल चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षित का ??? हीच माणसाची खरी ओळख का ? मोठं घर, मोठी कार, म्हणजे मिळालेले समाधान का ??
कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व तुमची धुंदी उतरवेलं सांगता येत नाही .•••••
या बाईच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले.
म्हणतात ना •••••
“कर्म से पहचान होती है इंसानों की । वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में “। •••••••
© सुश्री संध्या बेडेकर
भ्रमणध्वनी:- 7507340231
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अापण दुसर्याला कााय देऊ शकतो हे त्या अशिक्षित पण मनाने श्रीमंत असणाार्या बााईने अापल्या कृतीतून छाान प्रकारे सांगितले. छोटीशीच कथा पण खुप कांही सांगुन गेली.