सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
माझे कॉलेजला जाणे माझ्यासाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक होते. मी एकटी जाऊ शकत नव्हते. कोणीतरी मैत्रिण बरोबर असेल तरच नियमीत घडे. समजा कोणी आली नाही, तर वाट पहाण्याशिवाय मी काही
च करू शकत नसे. मात्र माझी ही अडचण बाबांनी ओळखली आणि उशीर होतोय हे लक्षात आल्यावर ते मला लुनावरून कॉलेज पर्यंत सोडायला यायचे, वर्गापर्यंत सोडायची त्यांची तयारी असायची, पण मी दिसले की कॉलेज मधली कुठलीही मैत्रिण, ओळख असो वा नसो, मला हात द्यायला यायची. त्यामुळे सगळ्याच माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या.
शाळे मध्ये माझ्या बाबांचे माझ्यावर protective कवच होते. सगळेजण सरांची मुलगी म्हणूनच मला ओळखत होते. मात्र कॉलेज मध्ये आल्यावर घरट्यातून पक्षी कसा भरारी मारतो, तसे मी माझ्या पंखांनी भरारी मारते आहे असेच मला वाटले. सगळे नवीन , मैत्रिणी नवीन, प्राध्यापक नवीन, वातावरण नवीन. सुखातीला फार बावचळल्यासारखे झाले, पण नंतर मीच जुळवून घ्यायला सुरवात केली. प्राध्यापक जे बोलतात, शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकायचे, ते सांगतील ते आणि तसेच करायचे हे मी पक्के ठरवले. .
१२वीच्या बोर्डाच्या परीक्षेला थोडे tension आले होते. रायटर ची मदत घ्यायची हेतर नक्की हेतेच. माझ्यासाठी एक वर्ग रिकामा ठेवला होता. मी आणि माझी रायटर एका बाकावर आणि सुपरवायझर मागच्या बाकावर बसल्या होत्या. त्यांनी त्यांचे काम चोख बजावले. रायटर कडे पुस्तक, कागद नाही ना, हे त्यांनी तपासले. त्यावेळी थोडे दडपण आले, पण माझा अभ्यास व्यवस्थित तयार होता. एक वेगळा अनुभव मिळाला आणि मला १२वी आर्टस ला ६१% मार्क्स मिळाले.
FY B. A. चे वर्ष सुरळीत पार पडले. पण SY मध्ये माझ्या दोन्ही बहिणींची पाठोपाठ लग्ने झाली. त्यामुळे घरी मला वाचून दाखवणे कमी झाले आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. मला A T K T मिळाली, माझा English विषय राहिला. मला फार वाईट वाटले. पण बाबानी धीर दिला.. ” अग, एवढे काय त्यात ? ऑक्टोबर ला सोडव”. त्यांनी माझा अभ्यास घेतला. पुनः रायटर शोधायला पाहिजे होती. माझ्या वर्गात अमीना सार वान नावाची मुलगी होती. ती मला खूप मदत करायची. तिच्या हाताला पोलीओ झाला होता. त्यामुळे स ह वेदना ती जाणायची. मला चांगला राइटर पाहिजे आहे हे समजल्यावर तिने तिच्या लहान बहिणीशी माझी ओळख करून दिली. समीना,बारावी मध्ये होती.ती तयार झाली.रोज संध्याकाळी सहा वाजता,प्रॅक्टिस म्हणूनजुने पेपर्स आम्ही सोडवले.समीना नं खूप छान काम केलं,पेपर मध्ये स्पेलिंग मिस्टेक्स केल्या नाहीत,मी सांगितलं तसं तिनं लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे मला शंभर पैकी अष्टयाहत्तर मार्क्स मिळाले.
अभ्यासाबरोबरच कॉलेजमध्ये मी वक्तृत्व स्पर्धेत आणि गॅदरिंग मध्येही भाग घेतला. अकरावीमध्ये सायोनारा हा डान्स प्रतिमान माझा बस वला. डान्स ची सगळे ड्रेपरी पांढरी मॅक्सि,ओढणी,पंखा सगळं सगळं सांगली मधुन आणलं होतं.डान्स खूप छान झाला.सगळ्या मुलींनी डोक्यावर घेतलं.माझा डान्स संपल्यावर”यही है राईट चॉईस बेबी”असा ठेका धरला होता घोषणा देत होत्या. ते मला अजूनही छान आठवते. माझे वक्तृत्व चांगले असल्यामुळे मैत्रिणी माझ्याकडून गाईडन्स घ्यायच्या. मी पण त्यांना मला जे येत असे ते बिनदिक्कत सांगत असे. आमच्यामध्ये निरोगी. कॉम्पिटिशन होती.
मी कॉलेजमध्ये रमले होते. खूप मैत्रिणी मिळाल्या,सगळ्या प्राध्यापकांची ओळख झाली,अडचण अशी काही आली नाही.सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि मी सुद्धा माझ्यापरी नं सांभाळून घेतलं.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈