सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ विसाव्याचे क्षण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
उरात रुतले काटे काही,
शल्य त्याचे टाकून देऊ!
आयुष्याच्या अंतिम अंकी,
रिक्त, मुक्त होऊन जाऊ!
जरी अंत हा माहीत नाही,
मरणाचे राही मनात स्मरण!
किती दिवस अन् किती वर्षेही,
मनात मोजी प्रत्येक क्षण क्षण!
मानव देह हा दिला प्रभूने,
काही करावे त्याचे सोने!
येता विसाव्याचे क्षण हे,
संपत जाई कणाकणाने!
स्मृतीत चिरंतन क्षण वेचावे,
मनीची खळबळ मनी रहावी!
एकांताच्या क्षणी रमावे,
अंतर्यामी गुंतून जावे!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈