सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग दुसरा) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

परवाच तर heart attack ने अचानक गेल्या पंचावन्न च्या आसपासच्या बकूमावशी आख्ख्या कॉलनीत ख्यातनाम होत्या. बडबड्या, विनोद करून सगळ्यांना हसवणार्‍या, कुणाच्याही मदतीला तत्पर!सगळी कॉलनी हळहळली. मलाही दोन दिवस झोप नाही लागली.

म्ह.. म्ह.. म्हण… म्हणजे… म्हणजे …. माझी दातखिळी बसली. पाय लटपटू लागले.

मी धाडकन खाली कोसळले… जाग आली तेंव्हा माझे डोके बकूमावशींच्या मांडीवर होते. ताडकन ऊडी मारुन ऊठले. मोठ्याने ओरडणार एव्हढ्यात त्यांनी मला ओठावर बोट ठेऊन गप्प राहण्याची खूण केली! आणी कॉफीचा कप पुढ केला! काही कळण्याआधी मी कॉफी पिऊन टाकली. ‘वा! काय पर्फेक्ट जमलीय!’ त्याही स्थितीत माझ्या मनात विचार आला. ‘जमलीय ना?दे टाळी!’ बकूमावशींचा हात पुढं आला. मा..झा..हा.. त आखडला. गरमागरम कॉफी पिऊन सुध्दा गारे sगा ss र .

मावशी म्हणाल्या,  “होय, बरोबर आहे तुझा अंदाज. मी अजून भूतच आहे बकूचं.” ?

“खूप भूक लागली म्हणून आले. पिठलं झकास होत हं!”

माझा चेहरा भितीनं अजूनही पांढरा फटक__

“काय करणार?  स्वर्गात जागाच नाही. यमराजाने पावती तर फाडली पण स्वर्गाचे दार बंदच !.. एकदम हाऊसफुल्ल !! वेटिंग वर आहे!!! मेल्या त्या कोरोना मुळे नुसती गर्दी च गर्दी !!!! तिथेही सगळे मास्क घातलेले लोक रांगेत ऊभे. ब्रम्हदेवही घाबरून PPE kit घालून बसलेत.”ही… ही… ही .. ??

“आणी अगो तो अश्विनी देव तो दारातच  थांबलाय किट घालून. या कोरोन्याने देवालापण घाबरवलं बघ. “पुन्हा ही . .ही. . ही. . ही. .

“तुल सांगते स्वर्गाच्या दारातच digital gun ने temp. चेक करून ‘PO2 बघून च आत घेतायत.”

“मला काही प्रॉब्लेम नाही ग. वेटिंग लिस्ट मोठी आहे म्हणून खाली पाठवल त्या यम्यानं.पाठवतो म्हणाला रेडा नंबर आलाकी.”

माझ्या पोटात कोपर ढोसून म्हणतात कशा — “मी ही माझी ‘बकेट लिस्ट’ पुरती करुन घेईन .”?  बापरे मी अजूनही श्वासहीन!?संध्याकाळी  बागेत पाणी  घालत होतीस ना  sss तेंव्हाच हळूच आत आले.चहा काय फक्कड होता म्हणून सांगू. पूर्ण दोन दिवस ऊपाशी होते ग.”

“अस्सं! म्हणजे वासूचा चहा तुम्ही  प्यायलात तर?” मी आवंढा  गिळत म्हंटलं.

असं म्हणताना मी हळूच त्यांची पावलं ऊलटी आहेत का हे चोरून बघत होते. त्या अगदी नेहमीसारख्या नीटनेटक्या दिसत होत्या.केसात मोगऱ्याचा गजरा सुध्दा होता. मावशींनी माझी नजर हेरली होती. पटकन साडी वर करून त्यांनी पावलं दाखवली. ती नॉर्मल होती.माझ्या खांद्यावर हात ठेऊन मावशी म्हणाल्या, “त्या सगळ्या ‘भूतश्रध्दा’ असतात गं. आम्ही माणसां सारखेच दिसतो. हां पण सगळीच माणसं नशीबवान नसतात!!”

 क्रमश: ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments