सौ.अंजली दिलिप गोखले
☆ विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
आज सकाळी सकाळी शिल्पाचा फोन आला. “काकू, ई अभिव्यक्ति वरचे माझे लिखाण वाचून एका आजींचा फोन आला होता. त्यांच्या आवाजावरून, बोलण्याच्या स्टाईल वरून आजी वाटल्या मला त्या. माझ्या लिखाणाचे कौतुक केले त्यांनी. आवडले म्हणाल्या.”
“अरे वा! छानच आहे मग. अभिनंदन, तुझा लढा पटतोय ना खूप जणांना”. मी म्हणाले.
“पण फोन ठेवताना मला आशिर्वाद देत म्हणाल्या, ” असेच सांगत जा आम्हाला. खूप मोठी हो. सौभाग्यवती हो!”. शिल्पा म्हणाली.
“चांगले आहे ना. छान आशीर्वाद मिळाला. उत्साह वाढेल तुझा.”
“काकू,!लग्न झालेल्यांना भाग्यवती म्हणतात ना आपल्याकडे. मग मी कशी काय?” जरा पडेल आवाजात शिल्पा म्हणाली.
“अगं, तसंच काही नाही. ती एक प्रथा आहे. तुला त्या आजी तसं म्हणाल्या कारण ई अभिव्यक्तिवर व्यक्त होण्याचे भाग्य तुला लाभलेआहेच. ते सौ पटीने वाढू दे, असा आशीर्वाद दिला त्यांनी तुला. शिल्पा, खरे सौभाग्य म्हणजे ज्याला जे येतं, आवडतं ते करायला मिळणं म्हणजे खरं भाग्य! आणखी एक सांगते, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी माता आहेत, ज्यांनी आपल्या एकटीच्या बळावर मुलांना मोठं केलं. सुसंस्कारित केलं. चांगले शिकून आपल्या पायावर उभं केलं.त्या सगळ्या माऊली सौभाग्यवती!सौभाग्यवती हे आदराने मान झुक विण्यासाठी म्हटलं जातं .तो एक मान आहे असं समज .त्या आजींनी एक प्रकारे तुझा गौरवच केलाय. तुझ्या साहित्याला केलेला मुजराच आहे. तुझ्या ज्ञानाचा,लिखाणाचा गौरवच आहे.”
खरोखर शिल्पा, अशा ग्रुपमध्ये तुझे विचार मांडायला मिळत आहेत हे खरंच तुझं भाग्य आहे. माझ्याही सदिच्छा सतत तुझ्या बरोबर आहेत. शिल्पा, तू सौभाग्यवती आहेसच. अशीच खूप खूप मोठी हो!तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्वांना दिपवून टाक.काव्य गंधाने सर्वांना मुग्ध कर. तुला तुझ्या मनातले विचार व्यक्त मिळोत. तुझे घुंगरा चे पदन्यास पहायला सर्वांना ते भाग्य लाभो. तुझ्या वक्तृत्वाची धार सर्वांना ऐकायला मिळो आणि तुझे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “जयोस्तुते” पहाण्याचे महद भाग्य सर्व वाचकांना, श्रोत्यांना आणि ईअभिव्यक्तीच्या संयोजकांना लाभो. खास या सर्वांसाठी आपण एक कार्यक्रम आयोजित करू.कोरोना चे संकट, सावट दूर झाले की खरंच आपण “शिल्पोत्सव” साजरा करू.
© सौ.अंजली दिलिप गोखले
मिरज
फोन नंबर ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
It is nice one to send on group. My mother like it.