स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’
जन्म – 1 ओक्टोबर 1919 मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆
☆ कवितेचा उत्सव ☆ पोटापुरता पसा …. महाकवी ग.दि. माडगूळकर ☆ कवितेचे रसग्रहण ☆ प्रस्तुति – सौ. अमृता देशपांडे ☆
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचिपुरता देई दाणा माय माऊली काळी
एकवेळच्या भुकेस पुरते तळहाताची खाळी ll
महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजे पुरती देई वसने जतन कराया काया
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी ll
सोसे तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दु:ख ईश्वरा रंक करी वा राजा
अपुरेपणहि न लगे, न लगे पस्तावाची पाळी
देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ll
गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर
चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia
(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)
प्रस्तुति – सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈