श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 77 ☆ वेदनेची भेट ☆
वेदनेची भेट झाली छान झाले
त्यामुळे मज जीवनाचे भान आले
समजुतीने वेदनेशी मीच घेतो
संशयाने पाहतो मज आज जो तो
काळजीने आज केली फार दाटी
लेक आली गोमटी ही आज पोटी
यातनांनी दार माझे वाजवीले
मास्क नव्हता तोड नव्हते झाकलेले
दिनकराने होय वनवा लावलेला
पेटले ते झाड ज्याच्या सावलीला
लागलेला हाच आहे घोर आता
दीन आहे त्यास येथे कोण दाता
नेत्र का हे पावसाळी मेघ आहे
काळ नाही वेळ नाही फाक्त वाहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈