श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #61 ☆
☆ नशीबाची भाषा ☆
नशीब म्हणजे असते काय
बोल मनीचे बोलत जाय .
नशीब म्हणजे ओली रेघ
आठवणींचा हळवा मेघ.
प्रयत्न सारे अपुल्या हाती
दोष नको रे दुसर्या माथी .
हसणे रडणे सारे भोग
हे जीवनातील योगायोग.
झुलवत ठेवी प्रत्येकाला
नशीब ज्याचे कळे न त्याला.
लागून राहे एकच आशा
कळून यावी, नशीब भाषा.
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈