श्री मुबारक उमराणी
☆ कवितेचा उत्सव ☆ एकांती ☆ श्री मुबारक उमराणी ☆
एकांती ठसते
वेदना कुणाला
काहूर सलतो
निशब्द मनाला
अंतरी जळतो
विचार जळण
धुरांचे वेटुळे
श्वासांचे दळण
थरथरे ओठ
अश्रुंचा तो पूर
स्मित हास्यरेषा
लोपतो तो नूर
अंकुश वेदना
सहन होईना
प्रयत्न करुनी
रडता येईना
रस्त्याची वर्दळ
मारीते रेघोट्या
दिवे लाल, रक्त
भरती रे पेट्या
धुराने माखती
फुलझाडे येथे
छळती अंतरी
वेदनेचे जथ्थे
© श्री मुबारक बाबू उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈