☆ कवितेचा उत्सव ☆ नगण्य ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆
तुझ्या एका अश्रूबिंदूने, माझ्या हृदयात प्रलय होतो
तुझ्या एका हास्याने, तेथेच कधी स्वर्ग फुलतो.
गालावरच्या खळीने तूच खोलवर हृदयात शिरतेस
एका शब्दाने कधी कधी, तू माझे आकाश पेलतेस.
तुझ्या एका स्पर्शाने, माझ्यात अनंत सतारी वाजतात.
तुझ्या एका कटाक्षाने, हृदयात असंख्य दिवे लागतात.
पण….हा फक्त भासच…
या साऱ्या “तुझ्या” मध्ये मी कुठे असतो?
तुझ्या भोवतालच्या गर्दीमधलाच मी एक असतो.
वेड्या मनाला किती वेळा सांगितले,
तू परमाणूतलाच एक आहेस,
आकाशातल्या बिजलीसाठी उगाचच झुरतो आहेस.
“ती” कधीतरी अशीच चमकून जाईल.
ओलावल्या धरणीचे “फोटो ”
काढेल, त्या फोटोत तरी तू असशील का ?
आता तरी झुरायचं सोडशील का ?
© डाॅ.व्यंकटेश जंबगी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈