सुश्री स्नेहा विनायक दामले
☆ कवितेचा उत्सव ☆ कसे जगावे…. ? ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆
कसे जगावे, कसे जगावे ?
कसे जगावे, कसे जगावे ?
असे जगावे, असे जगावे.
जन्मदात्यांचा अभिमान असावे,
जोडीदाराची खंबीर साथ व्हावे,
मुलांसाठी कर्तव्यदक्ष सावली असावे,
नातवंडांसाठी प्रेमळ हाक व्हावे,
इष्टमित्रांसाठी मदतीचा हात असावे,
कुणाच्या पाठीवरची प्रेरक थाप व्हावे..
ईश्वराचे लाडके होऊन रहावे,
पडणार्यास आधार असावे ,
चुकलेल्यास वाट व्हावे..
चंदनाचा वृक्ष व्हावे,
आसमंतास सुगंधित करावे,
पोळलेल्यास सुखवावे..
मंडळी,
असे जगावे, असे जगावे,
सत्श्रद्धा जपत,
श्रद्धास्थानच होऊन जावे,
जगण्याचा आदर्श व्हावे.
© सुश्री स्नेहा विनायक दामले
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈