सुश्री नीलाम्बरी शिर्के
☆ कवितेचा उत्सव ☆ झाड… ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆
आई नावाच्या झाडाला
वात्सल्याचा सदाच मोहर
वय वाढे पण मोहर ताजा
चिरंतन असे त्याचा दरवळ
मुले कितीही होवो मोठी
झाडापासून दूर जाहली
प्रेमभारल्या वात्सल्याची
डोईवर दे सदा सावली
या झाडाच्या देहावरती
नियतीने जरी दिलेच काटे
गरजवंताच्या डोईवर
शांत शितलशी छाया वाटे
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈