सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
अंधेरीत आमचा टु बीएचके पुढे मोठी बाल्कनी म्हणजे जवळ जवळ एक रुमच ती. आम्ही आता दोघं senior citizen. घर खायला उठायचे. मुलं आपापल्या संसारात US ला सेटल. आम्ही दोघंच 24 तास घरी. मनांत एक विचार आला. माझा 40 वर्षापूर्वीपासूनचा एक काॅलेजचा ग्रुप 5,6 जणांचाहोता. आता सगळ्यांचे life partner add होऊन double झाला. सगळे एकमेकांत छान मिसळू लागले. पुढे सगळ्यांची मुलं पण साधारण एकाच वयोगटातील असल्यामुळे त्या सगळ्यांचे पण छान जमत होते. आमचे असे एक कुटुंब झालं होतं. मधून मधून पिकनिकला. गेट-टु-गेदर करा. हे चालूच असायचे. कोणाच्या अडी-अडचणीला, सुखदुःखात आम्ही धावून जात होतो. मज्जेला तर सगळे होतोच. सगळ्यांची मुले मोठी झाली. नोकरी धंद्यासाठी इकडे तिकडे पांगली. त्यांची लग्ने झाली. मुली सासरी दुस-या ठिकाणी गेल्या.
आता काॅलेजचा मुळचा ग्रुप पण जवळपास सगळ्या जबाबदारीतून आपल्या पार्टनर सकट मोकळा झाला. निदान म्हणायला तरी. कोणाचा लाईफ पार्टनर अर्ध्या वाटेवर जग सोडून गेला होता. तसे आम्ही सगळे मुंबईतच आणि विशेष म्हणजे योगायोगाने का होईना पार्ले, अंधेरी, सांताक्रुझला रहात होतो. ग्रुपमधल्या एका मैत्रिणीचा निलिमाचा ब्लाॅक तर आमच्या बिल्डींग मध्ये आमच्याच मजल्यावर होता. तो विचार मनांत आला. पतीराजांशी चर्चा केली. ते म्हणाले माझी हरकत नाही. आपल्या मुलांशी फोनवर बोलून त्यांचे पण मत घे. आणि मग तुझ्या मित्रमैत्रिणीं बरोबर बोल. पण मला नाही वाटत ते आणि त्यांची मुलं तयार होतील. पण मी म्हटलं विचारुन तर बघू या. माझ्या मुलांना माझी कल्पना आवडली. दोघांनीही ग्रीन सिग्नल दिला. लवकर तयारीला लागा. म्हणून सल्ला पण दिला.
सगळ्यांना मी एका शनिवारी रात्री घरी रहायलाच बोलावले. पत्ते खेळलो, गाण्याच्या भेंड्या खेळलो. मग विषय काढला. माझ्या मनांत एक विचार आहे तुम्हाला पटतो का बघा? आता आपल्या पैकी बहुतेकांच्या घरात आपण sr. Citizen चअसतो. अगदी एकटं एकटं वाटते. तशी माझी आणि निलीमाची जागा 12,13 जणांसाठीं पुरेशी आहे. मी निलीमाशी पण बोलून घेतले आहे. तिला आणि तिच्या अहोना पण माझी कल्पना पटली आणि आवडली आहे. तर आपण एक महिना हा प्रयोग करुन बघू या का?
क्रमशः …
सौ. शशी नाडकर्णी -नाईक
फोन नं.8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈