सौ. नीला देवल
☆ कवितेचा उत्सव ☆ जीवनगाणे ☆ सौ. नीला देवल ☆
देवा हे तू बरे केलेस
अपयशाचे दान भरघोस दिलेस,
यशाच्या एकाच मोत्याने पाय भुवरच स्थिरावले.
देवा हे तू बरे केलेस
दुःखाचे चटके सोसताना,
काट्या सहित साहण्याचे गुलाब गुच्छ हाती दिलेस.
देवा हे तू बरे केलेस
दृष्टीला पापण्यांची कवाडे दिलीस,
अत्याचार दुराचार पाहण्या वेळेस कवाडे मिटली गेली.
देवा हे तू बरे केलेस
बुद्धी सह विवेकाचे ही दान दिलेस,
सद्सद बुद्धीने विवेक तराजूत सत् असत् तोलता आले.
देवा हे तू बरे केलेस
सुदृढ बाहु करतल दिलेस,
देणाऱ्याने आमाप दिले तरी पसा येवढे घ्यायचे शिकवलेस.
देवा हे तू बरे केलेस
मजबूत कणखर पाय दिलेस,
धावता पळता दम दिलास कुठे थांबायचे हे शिकवलेस.
देवा हे तू बरे केलेस
जन्ममृत्यू ताब्यात ठेवलेस,
अल्प स्वल्प आयुष्याचे जीवनगाणे गाता आले.
© सौ. नीला देवल
९६७३०१२०९०
Email:- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈