श्रीशैल चौगुले
☆ कवितेचा उत्सव ☆ शिशीर धुके ☆ श्रीशैल चौगुले ☆
धुक्यांचे आभाळ रानभर पांगले
फुल वेली दंगले दवाळून रंगले.
फिकी-फिकी प्रभात पुर्वदिशा फिकी
धुकाळून डोंगर रस्ते सगर झिंगले.
झाडांवर पाखरे हिमाळून सरित
दुपारचे ऊनही धुक्यातच बिंबले.
ऋतुहिम गारवे निसर्गात हिरवे
माणसाशी बरवे पारवेही थांबले.
अंगणीचे ओलावे धुक्यानेच पेलावे
धराईने तोलावे शिशीराचे झोंबले.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈