डाॅ. व्यंकटेश जंबगी
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ सुबोध श्रीमद् भागवत् महापुराण ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆
पुस्तक – सुबोध श्रीमद् भागवत् महापुराण
लेखक व परिचय – डाॅ. व्यंकटेश जंबगी.
रसिकहो नमस्कार,
आपल्या संस्कृतीत वेद, शास्त्र, पुराणे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महर्षि व्यासांनी लोकांमध्ये ईश्वर भक्तिचा उदय होण्यासाठी आणि मनाला शांती मिळण्यासाठी १८ पुराणे रचली. त्यात “श्री मद्भागवत् महापुराण”अत्यंत लोकप्रिय व श्रेष्ठ आहे. अनेक ठिकाणी श्री मद्भागवत् सप्ताह होत असतात. आमच्या घराण्यात सुमारे १०० वर्षांपासून श्री मद्भागवत् सप्ताह प्रतिवर्षी संपन्न होतो. श्री मद्भागवत् महापुराण खूप मोठे आहे. १२स्कंध,३४१ अध्याय,१८००० श्र्लोक आहेत. सर्वानाच एवढे वाचणे शक्य होईल असे नाही. म्हणून या महापुराणावर मी ५६० पानांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केले. त्या पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
१) सर्व १२२ कथा सविस्तर आहेत.
२) प्रत्येक अध्यायाचा सारांश.
३) महत्त्वाच्या श्लोकांचे स्पष्टीकरण.
४) तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगून, त्याविषयी श्री मद्भागवत् गीता, उपनिषदे, मराठी संतसाहित्य, सुभाषिते इ. संदर्भ घेतले आहेत.
५) रंगीत चित्रे, रंजक गोष्टी
६) शेवटी अपरिचित शब्दांचा परिचय व या पुराणातील उल्लेखित व्यक्तिंचा परिचय अशी २ परिशिष्टे आहेत.
एकूण ५६० पानांच्या या पुस्तकाची किंमत ४३०/रू असून जेष्ठ नागरिकांसाठी फक्त ३७०/रू आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम सैनिक कल्याण कार्यासाठी ध्वज निधीला देण्यात येणार आहे. पुस्तकाचे नाव:-“सुबोध श्री मद्भागवत् महापुराण कथा आणि तत्वबोध”असे आहे.
पुस्तकासाठी संपर्क:- डॉ. व्यंकटेश जंबगी
फोन:-9975600887
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈