☆ कवितेचा उत्सव ☆ अंतरीचा ईश्वर ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
किती गोडवा तो तुझ्या अंतरी
तुझ्या अंतरीच शोध भाव ईश्वरी
अर्पिण्यास का तू शोधतोस फूल पत्री
अंतरीच्या ईशाशी करावीस मैत्री
किती घालावे ते हार अन किती अलंकार
अंतरीच्या ईशालाच करावा श्रृंगार
अवडम्बराची नसावी फूकी आरास
अंतरीच्या ईशाचा घ्यावाच ध्यास
भुकेल्या जीवाना देऊनी घास
अंतरीच्या ईशाची बघ तू मिठास
पावती अन्नदान नको तो दिखवा
अंतरीच्या ईशाचा शांततेचा विसावा
वाचाळता ही जणू मिथ्याच सारी
अंतरीचा ईश तो कृतीवीना निर्विकारी
पाठपूजा निरंतर परी अंतरी क्लेश भारी
अंतरीचा ईश काढे मनुजामधिल दरी
नंदादीप तूज घरी हजेरीही मंदिरी
ईशत्व रोमात तुझ्या बघ एकदा अंतरी
© सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈