श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #68 ☆
☆ ग़ज़ल…! ☆
(मात्रावृत्त .)
एकटाच रे नदीकाठी या वावरतो मी
प्रवाहात त्या माझे मी पण घालवतो मी
सोबत नाही तू तरीही जगतो जीवनी
तुझी कमी त्या नदीकिनारी आठवतो मी
हात घेऊनी हातात तुझा येईन म्हणतो
रित्याच हाती पुन्हा जीवना जागवतो मी
घेऊन येते नदी कोठूनी निर्मळ पाणी
गाळ मनीचा साफ करोनी लकाकतो मी.
एकांताची करतो सोबत पुन्हा नव्याने
कसे जगावे शांत प्रवाही सावरतो मी .
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
छान ग़ज़ल..