☆ कवितेचा उत्सव ☆ कर्मयोगिनी ☆ प्रा. अशोक दास ☆
आता निवृत्तीत सेवा
असा कालखंड आला
तिच्या राबण्याचा जेव्हा
मला साक्षात्कार झाला.
सूर्य उगवण्याआधी
तिच्या दिवसाचा आरंभ
सारी निजानीज झाली
तरी राबण्यात दंग.
दोन मुले एक दूर
एक जवळ नांदतो
हिच्या मनामध्ये मात्र
दोघांसाठी ओले नेत्र.
सारे शेजारी पाजारी
हिचा त्यांच्यावरी जीव
लेकी बाळी खेळायाला
हिच्याशीच पाठशीव.
नाही थकत कधीही
नाही सांगत दमलेली
तृप्त शांत झोपलेली
कर्मयोगिनी वाटली.
चित्र सौजन्य – विपुल श्री – मार्च 2021
© प्रा.अशोक दास
इचलकरंजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈