सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ वचनपूर्ती… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

नित्यनेमे करितो रे

तुझ्या जन्माचा सोहळा

आनंदाने रंगूनिया

फुले भक्तीचाच मळा  ||

 

आम्ही सारे फक्त तुझ्या

पालखीचे होतो भोई

मस्त नाचता नाचता

रंगू भजनाचे ठाई ||

 

तूच फक्त नाही देवा

बाकी सारी तीच कथा

नित्य कानावर येई

द्रौपदीची नवी व्यथा ||

 

वाट बघतोस का रे

शंभर अपराधांची

नाही कुणालाच भीती

वाढ होते माजोऱ्यांची ||

 

धर्म संस्थापनेसाठी

अधर्माला निर्दालून

विश्‍वाच्या कल्याणास्तव

दिले येण्याचे वचन ||

 

द्रौपदीचा पाठीराखा

धर्माचा रक्षणकर्ता

धाव घेई आम्हास्तव

होऊनी सहाय्यकर्ता ||

 

पुरे झाली तुझी लीला

आता प्रत्यक्ष प्रकट

सांग पुन्हा नवी गीता

हाक आमुचा शकट ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments