☆ कवितेचा उत्सव ☆ महिला दिन विशेष – शापित अहिल्या ☆ सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆
पदस्पर्श रामाचा
त्याने शिळा धन्य झाली
शापातून सती अहिल्या
त्या स्पर्शाने मुक्त झाली
दिव्य होती ती साध्वी
दिव्य तो पावन स्पर्श
युगायुगांची कथा
गातो रामायण सहर्ष
आज…. संपली ती राम कथा
सत्यातून ‘राम’ गेला
स्वार्थापायी ‘राम -राम’
झाले सारे मलाच मला
स्पर्श झाला भयानक
. नको नको ती बला
बलात्कार,अन्याय, बळजबरी
अत्याचार सोसतेय अबला
आहे शापित अजुनी अहिल्या
शीळेहूनही घोर दशा
कधी काळी अवतरेल ‘राम’
. पद स्पर्शाची आर्त आशा.
© सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈