सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ कवितेचा उत्सव ? शांतादुर्गा.. ? सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
शांतादुर्गा पाठीराखी आई
हाकेसरशी धावून येई
संकट दूर पळूनी जाई
शांतादुर्गा तीच माझी आई !
नेसे शालू रंगीत नऊवार
शोभे नानाअलंकार त्यावर
रंगीत फुलेमाळा सभोवार
रुप दिसे ते राजस सुंदर!
जसे गाईचे वासरु
शेळीचे छोटे कोकरू
शांताईचे मी लेकरू
घाली मायेची पाखरू !
नाम घेता तिचे हो मुखी
जीवन हो आनंदी सुखी
न राही कोणी कष्टी दु:खी
शांतादुर्गा ती पाठीराखी!
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈