☆ कवितेचा उत्सव ☆ शब्दांचे सामर्थ्य ☆ संत ज्ञानेश्वर ☆
जैसे बिंब बचकेएवढे
परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे
शब्दाची व्याप्ती तेणे पाडे
अनुभवावी.
– संत ज्ञानेश्वर.
सूर्यबिंब आकाराने बचकेएवढे दिसते.पण त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यही अपुरे पडते. शब्द आकाराने लहान असतो पण त्याची व्याप्ती मोठी असते.त्याच्या अर्थाच्या विस्ताराला मर्यादा नसतात.
आज जागतिक कविता दिन
आपण सर्वांनी शब्दाचे हे सामर्थ्य ओळखून,समजून घेऊन काव्यलेखन करण्याचा प्रयत्न करूया.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈