श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
☆ रंजना जी यांचे साहित्य # 63 – सुट्टीला या तोड नाही ☆
परसात फुललेली फुलबाग ही आगळी।
सुगंधात धुंद कशी चंद्रमोळी झोपडी ।।२।।
भेटायला येते मला चिऊ काऊ मनी माऊ
सारेच तृप्त कसे खावूनीया गोड खाऊ।
आजीच्या या हाताला अमृताची असे गोडी ।।३।।
चिंचा बोरे फळे सारी रानमेवा अंत नाही ।
ऊस केळी डाळिंबाला खावे किती गणती नाही।
सोबतीला फौज अशी जमती सारे खेळगडी ।। ४।।
नाचू खेळू गोष्टी गाणी चिंता मुळीच नसे काही ।
अभ्यासाची कुरघोडी इथे मुळी चालत नाही।
स्वर्ग सुखा परि सारी सुट्टीला या तोड नाही।।५।।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈