श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – विडंबन कविता – किचनेशा (एक जुनी आठवण) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆
मूळ कविता – किति यत्ने मी पुन्हा पाहिली तूते, लीनते, चारुते, सीते ।।
——- किति दिवसांनी तुला पाहिले गँसा, प्रिय माझ्या रे किचनेशा ।।
——– तू गेल्याचा अजुनि आठवे दिवस, लाविला हात कर्मास।
——– पाहुणे घरी आले होते खास, मज आठवला विघ्नेश
——– भोवती स्टोव्ह हे जमले, ते फरफरले, फुरफुरले
——– तोंडास लागले काळे,मग रोजच रे असली अग्निपरीक्षा ॥१॥
——– संदेश तुला किती किती पाठवले. नाही का ते तुज कळले?
——– की कोणि तुला मधुनिच भुलवुन नेले?मी येथे तिष्ठत बसले
——– भाकरी नीट भाजेना, कुकरची शिटी होईना, झाली बघ दैना दैना
——– का विरहाची देशी असली शिक्षा,प्रिय माझ्या रे किचनेशा ॥२॥
——– आणि एके दिवशी——
——– दूरात तुझा लाल झगा झगमगला, जिव सुपा एव्हढा झाला
——– मी लगबगले, काही सुचेना बाई, महिन्याने दर्शन होई.
——– ओटा धुतला, स्वच्छ शेगड्या केल्या,कौतुके तुला मी पुसला.
——– ज्योत तुझी निळसर हसली, महिन्याची शिक्षा सरली,
——– मुखकलिका माझी खुलली, मनमुक्त अता फिरेन मी दाहिदिशा
——– प्रिय माझ्या रे किचनेशा ॥३॥
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈