सुश्री मीनाक्षी भालेराव
ओळख
(सुश्री मीनाक्षी भालेराव जी की भारतीय परिवेश में स्त्री की पहचान उजागर करती हृदयस्पर्शी कविता।)
लाहान असतानी
जेव्हा कुणी
घरी आल्यावर
आई बाबा मला
हाक मारून सांगायचे
बाला जा पटकन
चाह नाश्ता बनवून आण
अणी मी
अभ्यास वगैरा
सोड़ून
पदार्थ करून आणायचे
तेव्हा माझी ओळख होते
कित्ती हुशार हो
लेक तुमची
सुरेख नाष्टा बनविले
मुलगा बघायला आला तेव्हा ही
माझी ओळख
जेवण बनविल्यानी झाली
काय छाण जेवण
बनवल हो तुमची
लेक नी
आम्हाला आवडली
बर का
रिश्ता पक्का
तेव्हाही
मला कोणी विचारले नाही
तु अभ्यासात् कित्ती
हुशार आहे
इतर गोष्ठी तुला
अजून काय काय आवडते
सासरी पहिल्यांदा
रसोई बनविले
तेव्हाही माझी खुप
स्तुति झाली
अस वाटले मला
आज पण
समाजात काही
बदल झाला नाही
मुलगी कित्ती ही
शिकलेली असावी
कित्ती ही कमवून देणारी असावी
कित्ती ही गुणी असु दया
दिसायला सुरेख असू दया
पण तिची ओळख मात्र
छान स्वयंपाक बनवून देणारी
खाऊ घालणारी हिच राहते
स्त्री म्हणजे
स्वयंपाक घरातली
बन्धवा मजदूर ।
© मीनाक्षी भालेराव, पुणे
शुक्रिया जी बहुत-बहुत शुक्रिया