सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
☆ कवितेचा उत्सव ☆ वाटे तुझ्या संगे ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆
वाटे तुझ्या संगे जावे निसर्गात दूर
तिथे नको लोकांचा महापूर
शब्दांचाही वाटेल तिथे मला गलका
तुझ्यामाझ्यात असेल फक्त भावनेचा श्वास हलका
गुजगोष्टी किती करायच्या त्याला नसेल मेळ
गुंतून राहीलेल्या भावनांचा मनात असेल खेळ
सुखाचे क्षण उधळतांना वेळेची नसेल मर्यादा
आंतरिक समाधानाची भावना आनंद देईल ज्यादा
प्रेम प्रेम करावे किती त्याला नसेल पाश
आयुष्याच्या अंतर्यामी हिच असेल आस
© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
संपर्क –साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, कोंढवा पुणे
मुक्काम : सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.
फोन : ९८२२६२०५६६, ७५०६२४३०५०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
वाह फारच छान
खुपच सुंदर