सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
चक्रीवादळाच्या नावांचा रंजक इतिहास – कॅटरिना, नर्गिस, नीलम, निलोफर अन् लैला… संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.
कॅटरिना, नर्गिस, निलोफर, लैला ही नावे आहेत चक्रीवादळाची. या चक्रीवादळांना अनेक मजेशीर नावे असून, त्यांचा इतिहासही रंजक आहे. किनारपट्टीवरच्या लोकांना वादळाचा धोका कळावा म्हणून अशी नावे देण्याचा ट्रेंड सुरू झाला. बंगालच्या उपसागरात येणार्या वादळाचे बारसे घालण्याचे काम पूर्वी आठ देश करीत असत; पण आता एकूण 14 देश करतात. आता आलेल्या चक्रीवादळाला तोक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले आहे.
हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील नावे ठरविण्याचा अधिकार भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या आठ देशांना जागतिक हवामान संघटनेने बहाल केला. भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू अशी मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील नावे दिली, तर पाकिस्तानने नर्गिस, निलोफर, नीलम, लैला अशी अभिनेत्रींची नावे दिली. कॅटरिना हे नाव अमेरिकेने दिले आहे.
आठ देशांनी दिली 64 नावे ः भारत : अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू. बांगलादेश : ओनिल, ओग्नी, निशा, गिरी, हेलन, चंपाला, ओखी, फनी. मालदीव : हिब्रू, गोनू, ऐला, कैला, मादी, रोनू, मेकुनू, हिक्का. म्यानमार : प्यार, येमयीन, फॅन, ठाणे, नौक, कँट, दाय, कायर, तोक्ते.ओमान : बाझ, सीदर, वर्ड, मृजन, हुडहुड, नाडा, लुबन, महा. पाकिस्तान : पुनूस, नर्गिस, लैला, नीलम, निलोफर, वरध, तितली, बुलबुल. श्रीलंका : माला, रश्मी, बंडू, वियारू, अशोबा, मरूथा, गज, पवन. थायलंड : मुकदा, खाई-मूक, फेट, फायलीन, कोमेन, मोरा, फेथाई, आंफन बंगालच्या उपसागरात गतवर्षी आलेल्या आंफन महाचक्रीवादळाला थायलंड देशाने नाव दिले. 20 वर्षांतील हे सर्वात मोठे हे वादळ होते. जी वादळं प्रचंड नुकसान करून जातात, त्यांची नावे यादीतून कायमची काढली जातात. 2005 साली अमेरिकेतील न्यू एरोलिना प्रांतात आलेल्या ‘कॅटरिना’ वादळाने प्रचंड नुकसान केले, त्यामुळे ते नाव यादीतून काढले आहे. भारताने गती, तेज, मुरासू, आग, व्योम, जहर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, गुरूनी, अंबुद, जलाधी, वेग अशी 13 नवी नावे दिली आहेत.
तोक्ते म्हणजे सुरेल आवाजाचा सरडा..
यंदाच्या हंगामाची सुरुवात तोक्ते नावाच्या चक्रीवादळाने होत आहे. हे नाव म्यानमार देशाने दिले आहे. तेथे तोक्ते नावाचा सरडा सुरेल आवाज काढतो. त्यावरून हे नाव दिले आहे. या वादळाचा वेग ताशी 160 ते 175 कि. मी. राहू शकतो.
संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.
संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈