सौ. नीला देवल
? कवितेचा उत्सव ?
☆ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आदरांजली ☆ सौ. नीला देवल ☆
वि विनायक नाम ज्यांच्या विद्वत्तेचे
ना नावासम शारदेच्या वरद हस्ताचे
य यज्ञ कुंडी स्वातंत्र्याच्या समिधा आयुष्याच्या
क करी यत्न्य अखंड जाती नष्ट तेचा
दा दाता समृद्ध मराठी शब्द भांडाराचा
मो मोह त्यागिला उच्च बॅरिस्टर पदवीचा
द दशांगुळे रथ प्रतिभेचा दौडत काव्य निर्मिले कमला
र रवी तेजा सम प्रखर विचारी समाज सुधारक गमला
सा सावरले पतीता पावन केले जाती नश्टूनी ऐसा साधक
व वक्ता, द्रष्टा, जन प्रबोधक, भाषा शुद्धी कार
र रत अविरत स्वातंत्र्य ध्यास करण्या स्वप्न साकार
क करुनी त्या ग संसाराचा ब्रिटिशांना चारी ले खडे
र रवि शाशिही लज्जित झाले या दिव्य प्रखर तेजा पुढे
नरशार्दुल, कवी, लेखक, नाटक कार, भारत भूचा रत्नमनी
नेता, झुंजार स्वातंत्र्यवीर एकमेव ते नाव ओठावर
विनायक दामोदर सावरकर.
© सौ. नीला देवल
९६७३०१२०९०
Email:- [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈